Parbhani News: संस्थाचालकाच्या बेदम मारहाणीत पालकाचा मृत्यू ; परभणीत तीव्र संताप

Homeताज्या बातम्या

Parbhani News: संस्थाचालकाच्या बेदम मारहाणीत पालकाचा मृत्यू ; परभणीत तीव्र संताप

परभणीच्या झिरो फाटा येथील एका निवासी शाळेत टीसी मागितल्याने संस्थाचालकाने विद्यार्थ्याच्या पालकाला बेदम मारहाण केली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. य

सायखिंडी फाटा परिसरातील 100 युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
खड्ड्यांना हार घालून गांधीगिरी ; युवक काँग्रेसचे आंदोलन
पंकजा मुंडेंची सैद्धान्तिक बंडखोरी !

परभणीच्या झिरो फाटा येथील एका निवासी शाळेत टीसी मागितल्याने संस्थाचालकाने विद्यार्थ्याच्या पालकाला बेदम मारहाण केली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील झिरो फाटा येथील एका खाजगी निवासी शाळेत नुकताच दाखल केलेल्या विद्यार्थ्याची टिसी मागितल्याच्या कारणावरून संस्थाचालकाने बेदम मारहाण केल्याने पालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.10) रोजी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी संस्थाचालकासह एकावर पुर्णा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले.

बाळकृष्ण शिक्षण संस्थेची हायटेक निवासी शाळेत धक्कादायक प्रकार

या बाबत अधिक माहिती अशी की, झिरो फाटा परिसरात बाळकृष्ण शिक्षण संस्थेची हायटेक निवासी शाळा आहे. या शाळेत मागील काही दिवसांपूर्वी उखळद ता.पुर्णा येथील जगन्नाथ पांडुरंग हेंडगे यांनी आपली मुलगी पल्लवी हिला निवासी शाळेत दाखल केले होते. मात्र, एका आठवडयातच मुलीचे मन लागत नसल्याने पालक जगन्नाथ हेंडगे आणि नातेवाईक गुरूवारी सायंकाळी हायटेक निवासी शाळेत टिसी काढण्यासाठी आले. त्यांनी संस्थाचालकांना टिसी देण्याची विनंती केली.

संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीने लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. येथून पालक कसेबसे बाहेर पडले असता नातेवाईक व उपस्थितांनी त्यांना परभणी येथील शासकीय रूग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी मुंजाजी हेंडगे यांच्या फिर्यादीवरून संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नी यांच्या विरोधात पोलिसात बीएनएस कायद्याच्या विविध कमलान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान उपविभागीय अधिकारी समाधान पाटील, पोलिस निरिक्षक विलास गोबाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. शुक्रवारी सकाळपासूनच शाळा व परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मयत जगन्नाथ हेंडगे यांच्या पश्चात एक पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे उखळद व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. टीसी मागितल्याचा राग मनात धरून संस्थाचालकाने आणि त्याच्या पत्नीने इतकी मारहाण केली की, एका पालकाचा त्यामध्ये थेट जीव गेला.

COMMENTS