Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपरी महापालिकेचे कामकाज पेपरलेस

तब्बल 35 विभागांचा कारभार ऑनलाइन

पिंपरी : महापालिकेचा कारभार आता कागदविरहित (पेपरलेस) होणार असून, प्रशासनाने त्या दिशेने पाऊल टाकले आहे. ‘जीएसआय सक्षम ईआरपी’ प्रणालीचे अनावरण आयु

भावाच्या मारहाणीत लहान भावाचा मृत्यू
येत्या ४८ तासांत जोरदार पाऊस, या राज्यांना अलर्ट
व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून 23 वर्षीय तरुणाचा गळफास | LOKNews24

पिंपरी : महापालिकेचा कारभार आता कागदविरहित (पेपरलेस) होणार असून, प्रशासनाने त्या दिशेने पाऊल टाकले आहे. ‘जीएसआय सक्षम ईआरपी’ प्रणालीचे अनावरण आयुक्त शेखर सिंह यांनी केले. या कार्यप्रणालीनुसार पालिकेच्या विविध 35 विभागांचे कामकाज ऑनलाइन चालणार आहे. सर्व विभाग ऑनलाइन जोडण्यात येत आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचार्‍यांचे श्रम वाचून कामकाजात पारदर्शकता येणार आहे.
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील विवाहनोंदणी प्रमाणपत्र, सर्व नाट्यगृहांचे बुकिंग, ग्रंथालये, पशुवैद्यकीय विभागाकडील श्‍वान परवाने, माहिती अधिकार अर्ज (आरटीआय) आदी विभागांचे कागदविरहित ऑनलाइन कामकाज करण्यात येत आहे. आतापर्यंत नऊ विभागांचे कामकाज ऑनलाइन केले आहे. यापुढे उर्वरित विभागांचे कामकाजदेखील ऑनलाइन करण्यात येणार आहे. ‘जीएसआय सक्षम ईआरपी’ प्रणालीद्वारे नागरी सुविधा, सुरक्षा, ग्रंथालय, क्षेत्रीय कार्यालये, वैद्यकीय विभाग, भांडार विभाग यासह अन्य विभागांचे कामकाज ऑनलाइन होत आहे. अधिकारी, कर्मचार्‍यांना विभागातील सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. कामकाज संपूर्णपणे कागदविरहित होणार असल्याने अधिक सुलभता येणार आहे. सर्व कार्यालये ऑनलाइन झाल्यास कामकाजाच्या नस्ती, कागदपत्रे ऑनलाइन पाहता येतील. त्यामुळे कागदविरहित सर्व नस्तीला देखील मान्यता देता येणार आहे. शहरातील नागरिकांना आता घरी बसून ऑनलाइन विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढता येणार आहे. कागदपत्रे ‘अपलोड’ केल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयाकडून वेळ राखीव ठेवण्यात येणार आहे.

COMMENTS