Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिंदफणा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केले चांद्रयान 3 यानाचे पेपर मॉडेल

माजलगाव प्रतिनिधी - येथील विद्याभवन शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिंदफणा पब्लिक स्कूल येथे शाळेच्या सचिव मंगलताई सोळंके आणि समन्वयक नीला देशमुख यांच

लढवय्या सेनानी गमावला
ओबीसी आरक्षण बचावासाठी राज्य सरकारकडून दुहेरी प्रयत्न – छगन भुजबळ
“बघतोस काय रागानं ऊस घातलाय वाघानं”| LOK News 24

माजलगाव प्रतिनिधी – येथील विद्याभवन शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिंदफणा पब्लिक स्कूल येथे शाळेच्या सचिव मंगलताई सोळंके आणि समन्वयक नीला देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महात्मा गांधी मिशन ए. पी. जे. अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्र संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी चांद्रयान 3 यानाचे पेपर मॉडेल तयार केले.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था येत्या 13 जुलै रोजी चांद्रयान 3 या चांद्रशोध मोहीम यानाचे प्रक्षेपण करणार आहे. या अनुषंगाने या विषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी संभाजीनगर येथील महात्मा गांधी मिशन ए.पी. जे. अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्राच्या वतीने शाळेत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी एम.जी. एमच्या रवींद्र मोरे आणि योगेश साळी यांनी विद्यार्थ्यांना मोहिमेविषयी माहिती दिली तसेच पेपर मॉडेल तयार करण्यासाठी त्यांना मदत केली. या कार्यशाळेत इयत्ता सहावी ते नववीच्या एकूण 219 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.  यापूर्वी शाळेतील विद्यार्थी अभिनव विटेकर यास विज्ञान केंद्राने मार्गदर्शन केले आहे. अभिनव याने राज्यस्तरावरील खगोल परिषदेत सहभाग नोंदविला आहे. या कार्यशाळेच्या आयोजनात अभिनवचे वडील मारुती विटेकर यांची विशेष मदत झाली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेल्सचे प्राचार्य अन्वर शेख व उपप्राचार्य राहुल कदम यांनी कौतुक केले.  कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी माध्यमिक विभागाचे प्रमुख जीबी ऑगस्टीन, विज्ञान विभागाचे प्रमुख राजेंद्र सवई तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी  प्रयत्न केले.

COMMENTS