Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंकजा मुंडेच्या ’शिवशक्ती’ यात्रेला सुरुवात

माहुरच्या रेणुका मातेचे दर्शन घेतल्यानंतर शक्तीप्रदर्शन

मुंबई प्रतिनिधी ः विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय नेत्य पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणात अजूनही वापसी करता आलेली नाह

सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आल नाही…उद्धव ठाकरे तुम्ही सुद्धा
जागतिक फार्मासिस्ट दिन व कोरोना योध्दा सत्कार समारंभ जिल्हा परिषदेच्या सभागृहात संपन्न
विचारधारा आणि पक्ष एकच ः आमदार लंके

मुंबई प्रतिनिधी ः विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय नेत्य पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणात अजूनही वापसी करता आलेली नाही. याची खदखद त्यांनी अनेकवेळेस जाहीर बोलून दाखवली आहे. पक्षाने त्यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली असली तरी त्यांना राज्याच्या राजकारणात रस आहे, विशेष म्हणजे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांना संधी दिली जाईल असे वाटत असतांना त्यांना पुन्हा डावलण्यात आले. त्यानंतर सततच्या नाकारण्यामुळे राजकारणाचा कंटाळा आल्याने दोन महिन्यांचा राजकीय ब्रेक घेणार्‍या पंकजा मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. मात्र, या वेळी त्यांनी राज्यात शिवशक्ती यात्रा काढत धार्मिक स्थळांना भेटी देण्याची तयारी केली असून, यातून त्या पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन करतांना दिसून येत आहे.
बुधवारी या यात्रेला सुरूवात झाली असून, यात्रेच्या पहिल्याच दिवशी पंकजा मुंडे यांनी श्री क्षेत्र माहुर गडावरील रेणुका मातेचे दर्शन घेतले. या दरम्यान त्या नांदेड विमानतळावरुन माहुरला रस्ते मार्गाने पोहोचल्या. मार्गात त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष राजकीय घडमोडींमध्ये सहभागी न होता, शिवशक्ती यात्रेच्या माध्यमातून लोकांना भेटणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यभरात अकरा दिवसांच्या या दौर्‍यात त्या दहा जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर अडगळीत टाकल्याची भावना पंकजा मुंडे यांच्या मनात असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी अनेकदा नाराजी देखील व्यक्त केली होती. आपण या संदर्भात केंद्रीय नेतृत्त्वाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. तरी देखील भाजपमध्ये कोणतीच हालचाल न झाल्याने अखेर दोन महिन्यांचा ब्रेक घेत त्यांनी चर्चा कमी करण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र, शिवशक्ती यात्रेच्या माध्यमातून आपण जनतेच्या संपर्कात राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या दौर्‍यात नागरिकांना मला भेटण्यासाठी यावे, असे आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी केले होते. त्या प्रमाणे त्यांनी रस्ते मार्गाने जाताना नागरिकांच्या भेटी घेतल्या. पंकजा मुंडे यांचा हा दौरा श्रावण मासामुळे महादेवांच्या म्हणजे शिवांच्या पूजेसाठी काढण्यात येत आहे. त्याच बरोबर शक्तीचे प्रतीक असलेल्या दुर्गामातेचेही दर्शन या दौर्‍यात पंकजा मुंडे घेणार आहेत. त्यामुळे हा शिवशक्ती दौरा असल्याचे सांगितले जाते. दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर पंकजा मुंडे राजकीय घडामोडी विरहित दौरा करतील का? असा प्रश्‍न विचारला जात आहे.

राजकीय ब्रेकनंतर पुन्हा सक्रीय – भाजप नेत्या पंकजा मुंडे या दोन महिन्याच्या राजकीय ब्रेकनंतर पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी माहुर येथील श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले. मात्र, हा दौरा केवळ देवदर्शनासाठी असेल असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ब्रेकवरुन परतलेल्या पंकजा मुंडे राजकारणात सक्रिय होणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

COMMENTS