Homeताज्या बातम्याविदेश

पाकिस्तानने मध्यरात्री केली संसद बरखास्त

इम्रान खानशिवाय निवडणुका घेण्याचे संकेत

इस्लामाबाद/वृत्तसंस्था : पाकिस्तानमध्ये मध्यरात्री हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. येथील संसद मध्यरात्री बरखास्त करण्यात आली. पंतप्रधान शेहबाज

मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची पुन्हा दिल्लीवारी !
भीषण अपघात : बसची वाट पाहत थांबलेले चौघे ठार; सख्ख्या बहिण-भावाचाही समावेश (Video)
तरुणांनी राजकारणात येण्याची हिच खरी वेळ – विनोदसिंग परदेशी

इस्लामाबाद/वृत्तसंस्था : पाकिस्तानमध्ये मध्यरात्री हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. येथील संसद मध्यरात्री बरखास्त करण्यात आली. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी ही कार्यवाही केली. पंतप्रधानांचाही कार्यकाळ आता संपुष्टात आला त्याच्या तीन दिवसाआधीच संसद बरखास्त करण्यात आल्याने काळजीवाहू पंतप्रधान नेमला जाणार आहे.
 पाकिस्तानमध्ये बुधवारी रात्री उशिरा पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या सूचनेनुसार पाकिस्तानचे राष्ट्रपतींनी संसद बरखास्त केली. सरकारचा कार्यकाल समुष्टात येण्या आधीच हा निर्णय घेण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. तेथे निवडणुकीची वेळ आली आहे. 12 ऑगस्ट रोजी संसदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आहे. याच्या तीन दिवसांपूर्वीच संसद बरखास्त करण्याची शिफारस करण्यात आली होती. आता पुढील 90 दिवसांत निवडणुका घेतल्या जाणार आहेत. पंतप्रधानांनी यापूर्वी संसदेत सांगितले होते की, मी बुधवारी रात्री राष्ट्रपतींना संसद विसर्जित करण्याचा सल्ला देईन. काळजीवाहू पंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती करण्यासाठी दोन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी निवड करण्यासाठी गुरुवारी विरोधी पक्षनेत्याशी चर्चा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रपतींकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार कलम 58(1) अंतर्गत नॅशनल असेंब्ली विसर्जित केली आहे. या मंजुरीनंतर, केंद्रीय मंत्रिमंडळ देखील विसर्जित झाली. या बाबत शरीफ म्हणले, आम्ही तुम्हाला सांगतो की, पाकिस्तानमध्ये मतदानाला काही महिने विलंब होऊ शकतो. कारण निवडणूक आयोग नवीन जनगणनेच्या आधारे शेकडो मतदारसंघांची पुनर्रचना सुरू करणार आहे. विश्‍लेषकांनी असे म्हटले आहे की निवडणुकीला विलंब झाल्यास जनतेचा रोष वाढू शकतो. जुलै 2018 मधील शेवटची सार्वत्रिक निवडणूक इम्रान खान यांच्या पक्षाने जिंकली होती. त्यांनी पहिल्यांदाच पंतप्रधानपदाची शपथ घेतली. गेल्या वर्षी अविश्‍वास ठरावानंतर पंतप्रधानपदावरून हटवण्यात आल्यापासून इम्रान खान राजकीय गोंधळाच्या केंद्रस्थानी आहेत. पाकिस्तानच्या स्थैर्याबाबत चिंता वाढली आहे. त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरवून तुरुंगवास भोगावा लागला. यामुळे त्यांना पाच वर्षे कोणत्याही निवडणुकीत भाग घेता येणार नाही. इम्रान खान यांनी पाकिस्तानी लष्करावर आपल्याला सत्तेतून हाकलल्याचा आरोप केला आहे. मात्र, लष्कराने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

COMMENTS