Homeताज्या बातम्यादेश

दोन महिलांची नग्न धिंड काढल्याने देशभरात संताप

मणिपूर राज्यातील घटना ; एका आरोपीला पोलिसांनी केली अटक

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूर जळत असतांनाच, गुरुवारी याच राज्यात दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर त्यांची नग्न ध

मुलीला माहेरी पाठवण्यास नकार देत बापावर कोयत्या,काठ्यांनी हल्ला.
निळवंडे डाव्या कालव्याचे पुंढ भागातील काम तातडीने करावे
आलियासाठी माधुरी दीक्षितने पाठवलं खास गिफ्ट

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूर जळत असतांनाच, गुरुवारी याच राज्यात दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर त्यांची नग्न धिंड काढल्याचे समोर आल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. या संपूर्ण प्रकरणाची दखल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देखील घेतली असून, कारवाई करा, अन्यथा आम्ही कारवाई करतो, असा इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे.
हा व्हिडिओ 4 मे 2023 चा असून, हा व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी देशभरात या व्हिडिओचे पडसाद उमटले आहेत. या प्रकरणात मणिपूर पोलिसांनी 33 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातली ही पहिली अटक आहे. दोन महिलांना नग्न करण्यात आले आणि त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मणिपूरमध्ये घढला. या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी आरोपीचे नाव हेरम हेरा दास असे असून तो थौबलचा रहिवासी आहे असे सांगितले आहे. येत्या काही तासांमध्ये आणखी काही आरोपींना अटक केली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे. जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात बलात्कार आणि हत्येची कलमे दाखल करण्यात आली आहेत.  मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 4 मे 2023 रोजी मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात ही घटना घडली. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, दोन महिने उलटूनही अद्याप आरोपींना अटक झाली नव्हती. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी निवेदन जारी करत पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याचे सांगितले, त्यानंतर गुरूवारी सकाळी या प्रकरणातल्या पहिल्या आरोपीला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक के. मेघचंद्र सिंह यांनी या व्हायरल व्हिडीओबाबत निवेदन जारी केले. ते म्हणाले, दोन महिलांना नग्न करून धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना 4 मे 2023 रोजी घडली. यानंतर सशस्त्र अज्ञात आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस अटक करण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

व्हिडिओ शेअर न करण्याचे केंद्राचे आवाहन – मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची विवस्त्र अवस्थेत रस्त्यावरून धिंड काढली. राजधानी इंफाळपासून 35 किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात 4 मे रोजी ही घटना घडली. त्याचा व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. केंद्र सरकारनेफेसबुक-ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला हा व्हिडिओ शेअर न करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकार ट्विटरवर कारवाई करू शकते.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सरकारला फटकारले – मणिपूरच्या व्हायरल व्हिडिओची आता सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेतली आहे. यावर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी गुरुवारी जोरदार टीका करत केंद्र आणि राज्य सरकारला फटकारले आहे. जे व्हिडिओ समोर आले आहेत ते चिंताजनक असल्याचे चंद्रचूड यांनी म्हटले आहे. याप्रकरणी मे महिन्यापासूनच कारवाई व्हायला हवी होती, असेही त्यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. आम्ही सरकारला कारवाई करण्यासाठी थोडा वेळ देऊ, नाही तर आम्हाला कारवाई करावी लागेल असेही चंद्रचूड यांनी म्हटले आहे.

आरोपींना सोडणार नाही ः पंतप्रधान मोदी – मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्यानंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेवर भाष्य केले आहे. तसेच मणिपूरच्या मुलींबरोबर झालेला प्रकार कधीही माफ केला जाऊ शकत नाही. माझे मन दुःख आणि रागाने भरले आहे. मणिपूरची जी घटना समोर आली ती कोणत्याही सभ्य समाजासाठी लज्जास्पद घटना आहे. हे पाप करणारे, गुन्हा करणारे किती आहेत, कोण आहेत हे बाजूला ठेवा. मात्र, या घटनेने संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावले आहे. 140 कोटी देशवासीयांना खाली पहावे लागत आहे. मी सर्व मुख्यमंत्र्यांना आग्रह करतो की, त्यांनी आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्था मजबूत करावी. आपल्या आई-बहिणींच्या सुरक्षेसाठी कठोरात कठोर पावले उचलावीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

COMMENTS