Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोबाईलपेक्षा मैदानी खेळांना महत्व द्यावे

आमदार आशुतोष काळे यांचे प्रतिपादन

पुणतांबा प्रतिनिधी ः मोबाईलमुळे सर्वत्र संस्कृती बिघडली असून लहान मुलापासून सर्वांना मोबाईल ने ग्रासले असून अति मोबाईल वापरामुळे त्याचे विपरीत पर

सहा देवस्थानच्या 3 कोटीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी
जिल्हा परिषदेच्या 10 शाळा खोल्यांना 1.20 कोटी निधी मंजूर
जागर स्त्री शक्तीचा नवरात्रौत्सवाची उत्साहात सांगता

पुणतांबा प्रतिनिधी ः मोबाईलमुळे सर्वत्र संस्कृती बिघडली असून लहान मुलापासून सर्वांना मोबाईल ने ग्रासले असून अति मोबाईल वापरामुळे त्याचे विपरीत परिणाम होत आहे. मुलांना मैदानी खेळ व त्यांचे छंद जोपासण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे, यासाठी सर्व पालकांनी प्रयत्न करावे व नवीन पिढी घडवण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आव्हान आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

पुणतांबा येथील आप्पासाहेब धनवटे मेमोरियल चारिटेबल ट्रस्टचे लिटल एंजल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी आमदार काळे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणरागिणी महिला मंडळाच्य संस्थापक अध्यक्ष सौ डॉक्टर धनश्री सुजय विखे या होत्या तर व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन डॉक्टर धनश्री व डॉक्टर धनंजय धनवटे संस्थेच्या संचालिका वैजयंती धनवटे राहुल धनवटे दीपक नाईक दीपक धनवटे आशा केंद्र चे व्यवस्थापक किशोर कदम दत्तात्रय नळे चक्रधर सोनवणे मनोज धनवटे मनीषा धनवटे तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या कार्याचा आढावा संचालिका वैजयंती धनवटे यांनी मांडला तर माजी सरपंच डॉक्टर धनंजय धनवटे यांनी आगामी शैक्षणिक उपक्रम व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. याप्रसंगी आमदार आशुतोष काळे म्हणाले की पुणतांब्यासारख्या ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करणे अवघड काम असून डॉक्टर धनवटे व त्यांच्या परिवाराने इंग्रजी शाळा उघडून विद्यार्थ्यांची सोय केली. यावेळभ डॉक्टर धनश्री विखे म्हणाल्या की, लिटल एंजल स्कूलने 14 वर्षात विद्यार्थी घडवण्याचे कार्य केले संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला असता दर्जेदार शिक्षण व विद्यार्थी घडविण्याचे कार्य संस्था करते हे प्रेरणादायी असून समाजामध्ये गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहतात त्या मुलांना सामाजिक दायित्व स्वीकारून शिक्षण दिले गेले पाहिजे यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन विखे यांनी केले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले या सांस्कृतिक कार्यक्रमात आपले सण व सांस्कृतिक यावर मुलांनी नृत्य करून सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमाला बाबासाहेब को ते ग्रामपंचायत सदस्य श्याम धनवटे सुनील थोरात राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन जोगदंड रामचंद्र पवार अक्षय सोमवंशी रामकृष्ण चव्हाण आदी मान्यवर व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

COMMENTS