Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामान्य नागरिकांसाठी आमचे दरवाजे सदैव खुले – डॉ.योगेश क्षीरसागर

इंद्रप्रस्थ कॉलनी भागातील विकास कामांना सुरुवात

बीड प्रतिनिधी - शहरातील प्रभाग क्र.12 मधील इंद्रप्रस्थ कॉलनी भागात विकास कामांना सुरुवात झाली असून या परिसराची डॉ.योगेश क्षीरसागरांनी पाहणी करत व

आमिर खानच्या लेकीचं मराठमोळं केळवण
हिंमत असले तर मंत्र्यांशिवाय निवडणूक लढवून दाखवा : विक्रमभाऊ पाटील
क्रिकेट सट्टयात गमावलेले पैसे चुकविण्यासाठी दागिन्यांची चोरी

बीड प्रतिनिधी – शहरातील प्रभाग क्र.12 मधील इंद्रप्रस्थ कॉलनी भागात विकास कामांना सुरुवात झाली असून या परिसराची डॉ.योगेश क्षीरसागरांनी पाहणी करत विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
शहरातील नगर रोडवरील इंद्रप्रस्थ कॉलनी भागात रस्ते, नाली कामाच्या शुभारंभ प्रसंगी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी स्थानिक नागरिक आणि महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच स्थानिक नागरिकांसोबत परिसराची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरीकांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्याकडे मूलभूत गरजा सोडविण्याची मागणी केली. डॉ.योगेश क्षीरसागर यांनी देखील नागरिकांच्या आणि महिलांच्या सूचना ऐकून घेत त्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.
डॉ.योगेश क्षीरसागर स्थानिकांशी बोलताना म्हणाले की, इंद्रप्रस्थ हा शहरातील खूप जुना भाग आहे. या भागातील नागरिकांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत.  सामान्य नागरिकांनी त्यांच्या समस्या आमच्या पर्यंत पोहचवाव्यात त्यांच्यासाठी आमचे दरवाजे सदैव खुले आहेत. या भागातील मूलभूत गरजा ह्या टप्प्या टप्प्यात सोडविल्या जातील. आपले प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला जाईल. यातून या भागातील प्रश्न मार्गी लागतील. येथील ड्रेनेजच्या बाबतीत संबंधित अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. बीड शहरासाठी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यातून नवीन 30 ते 40  घंटागाड्या उपलब्ध होतील. त्यामुळे कचरा घेऊन जाण्यासाठी सर्व प्रभागात नियमित घंटागाड्या येतील. पाण्याचा प्रश्न देखील लवकरच सुटेल. यामुळे बीडकरांना 4 ते 5 दिवसाला चांगल्या प्रवाहाने पाणी उपलब्ध होईल. स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वच्छता अधिकारी आणि कर्मचार्यांना पाठवून पूर्ण भागाची स्वच्छता करण्यात येईल. यासह या भागातील विविध प्रश्न येत्या महिन्याभरात सुटतील. यातून स्थानिक नागरिकांना या भागात झालेला बदल दिसून येईल. यावेळी मा.नगरसेवक सादेक शेख, नितीन जायभाये, मंगेश सानप, सुभाष तोगे, राजेंद्र खेडकर, सलिम खान, इसा चाऊस, हाफीज मैनुद्दीन, डॉ.रमेश शिंदे, संतोष सांगुळे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS