Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अन्यथा फडणीवासांचे राजकारण संपवेन!

मनोज जरांगे यांचा इशारा ; मागण्या मान्य करण्याची मागणी

जालना ः मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले असून, त्यांनी बुधवारी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ललकारल

मनोज जरांगे बॅकफूटवर ; शिंदे, फडणवीसांची मागितली माफी
आमचा बोलवता धनी मराठा समाज मनोज जरांगेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
समाजाशी दगाफटका केल्यास जड जाईल

जालना ः मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले असून, त्यांनी बुधवारी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ललकारले आहे. राज्य सरकारला सुट्टी नसून, सरकारने 2-3 दिवसांत मागण्या मान्य कराव्यात अन्यथा देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय जीवन उद्धवस्त करू असा थेट इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे.
माध्यमांशी संवाद साधतांना मनोज जरांगे बोलत होते. यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, सरकारमध्ये सरपंचाला काही किंमत नाही. उपसरपंचच खरा मालक आहे. फडणवीस यांच्याच हातात राज्याचा सर्व कारभार आहे. आरक्षणाच्या प्रश्‍नात फडणवीस हेच अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दलित, ओबीसी, धनगर, मुस्लिमांच्या आरक्षणासह शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांनाही तेच जबाबदार आहेत. मराठा समाजाने सरकारला वर्षभराचा वेळ दिला. आता त्यांना विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना 2-3 दिवसांच्या आत आमच्या मागण्यांवर अंमलबजावणी करावी लागेल. सगेसोयरेचीही तत्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्याची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला पाहिजे. तिन्ही गॅझेटचीही अंमलबजावणी झाली पाहिजे. सरकारने राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. आमची मागणी 2-3 दिवसांत पूर्ण झाली नाही तर सरकारची अवस्था फारच वाईट होईल. मला राजकीय भाषा बोलत नाही. बोलणारही नाही. मला किंवा माझ्या समाजाला राजकारणातही जायचे नाही. ही देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. त्यांनी या संधीचे सोने करावे. आमच्या मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा ते मराठा समाजाचे दोषी ठरतील. देवेंद्र फडणवीस हे या राज्यातील गरिबांवर अन्याय करणारे एकमेव व्यक्ती आहेत. मी मागील 506 दिवसांत एकही राजकीय शब्द उच्चारला नाही. फडणवीस यांनी मला राजकारणाच्या वाटेवर नेऊन सोडू नये. कारण मी एकदा त्या वाटेला गेलो, तर मग मला कुणीही पाडापाडी कशी झाली? राजकीय वाटोळे का झाले? हे मला विचारू नये.

राजकारणाच्या रस्त्यावर उतरल्यास तुमचा खेळ खल्लास ! – मनोज जरांगे आपला संताप व्यक्त करताना पुढे म्हणाले, सरकार आम्हाला किती दिवस प्रक्रिया समजावून सांगणार? हा आम्हाला मूर्खात काढण्याचा प्रयत्न आहे. आता त्यांचे कोणतेही नाटक चालणार नाही. मी राजकारणाच्या रस्त्यावर आलो तर तुमचा खेळ खल्लास होईल. त्यामुळे मी त्या वाटेला जाणार नाही याची खबरदारी घ्या. ओबीसी, धनगर, मुस्लिम, दलित आदी समाजाला वेड्यात काढून हे लोक सत्ता उपभोगत आहेत. पण यावेळी सरकारला सुट्टी नाही.

COMMENTS