परांडा तालुक्यातील टाकळी येथील वडार समाजातील अल्पवयीन मुलीवरील झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्यावतीने तहसीलद
परांडा तालुक्यातील टाकळी येथील वडार समाजातील अल्पवयीन मुलीवरील झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्यावतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.
ही अत्याचाराची घटना जिल्ह्याच्या नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राच्या तोंडाला काळिमा फासणारी आहे. या घटनेचा निषेध संघटनेच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला. ही झाल्यावर परंडा येथील पोलीस पथकाने संबंधित नराधमास अटक केली आहे. मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीची सखोल चौकशी करून त्यास कठोर शिक्षेची कार्यवाही करण्यात यावी. हे प्रकरण जलदगती न्यायालयात घेऊन नराधमास फाशीची शिक्षा व्हावी. या घटनेचा निष्पक्षपणे तपास करून पीडित कुटुंबीयांना न्याय देण्यात यावा. घटनेचे गांभीर्य पाहता आरोपीच्या कुटुंबीयांकडून पिडीत कुटुंबियांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून पोलीस संरक्षण देण्यात यावे. अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश ईटकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील पवार, तालुकाध्यक्ष भास्कर ईटकर, राम ईटकर, परमेश्वर पवार, ब्रह्मदेव मांजरे, अमर भोसले, अविनाश भोसले आदींसह वडार समाज बांधव उपस्थित होते.
COMMENTS