Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंद्यात नोकरी मेळाव्याचे आयोजन

नागवडे विचारमंच आणि छ.शिवाजी महाविद्यालयाचा पुढाकार

श्रीगोंदा : छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथे अनुराधाताई राजेंद्र नागवडे विचारमंच आणि श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील

शनिशिंगणापरात पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी
वाघाला पकडणे सोपे , पण माकडाला पकडणे अवघड
राजकीय पक्षांच्या ऑफर धुडकावत सामाजिक कामांनाच महत्व दिले : पोपटराव पवार

श्रीगोंदा : छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथे अनुराधाताई राजेंद्र नागवडे विचारमंच आणि श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने मुलाखत पुर्व ट्रेनिंग आणि भव्य रोजगार मेळवा 2024 चे आयोजन करण्यात आल्याची माहिती सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यावेळी बोलताना म्हणाले की; श्रीगोंदा आणि परिसरातील सुशिक्षित होतकरू गरजू पदवी आणि पदवीतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी  शुक्रवारी 23 ऑगस्ट 2024 ते 29 ऑगस्ट 2024 पर्यंत दररोज सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत मुलाखत पूर्व तयारी मोफत प्रशिक्षण आणि शुक्रवार 30 ऑगस्ट 2024 रोजी भव्य रोजगार मेळावा सकाळी ठीक 10 वाजता पार पडणार आहे. पुढे बोलताना नागवडे आणखी म्हणाले की; पुणे परिसरातील 18 पेक्षा जास्त विविध नामांकित बँकिंग फायनान्स इंडस्ट्री मधील 400 पेक्षा जास्त रिक्त जागांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या अगोदर होणार्‍या ट्रेनिंगमधून विद्यार्थ्यांमध्ये मुलाखतीला सामोरे जाण्याअगोदर आत्मविश्‍वास निर्माण होणार आहे. असे देखील नागवडे यांनी यावेळी आवर्जून सांगितले. अधिक माहिती देताना नागवडे पुढे म्हणाले की पुणे परिसरातील पिंपरी चिंचवड; शिवाजीनगर, पुणे स्टेशन परिसर, विमान नगर, मगरपट्टा सिटी, बंडगार्डन, येरवडा परिसर आणि इतर सर्व पुणे विभाग हे कार्यक्षेत्र नोकरीच्या ठिकाणी असणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता बीए, बी कॉम, बीएससी, बीसीए, बीसीएस, डिप्लोमा, एम कॉम, एम एससी आदी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच पदवीत्तर मधील शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यात सामील होऊ शकतात. असे देखील नागवडे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.या रोजगार मेळाव्यामध्ये जवळपास 18 कंपन्या व बँका सहभागी होणार आहेत अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली. या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त गरजू आणि होतकरू मुले आणि मुलींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन अनुराधाताई राजेंद्र नागवडे विचारमंच तर्फे आवाहन करण्यात आले आहे. या आयोजित पत्रकार परिषदेस जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे, नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे, विश्‍वनाथ गिरमकर, मारुती पाचपुते, योगेश भोईटे, विठ्ठल जंगले, भाऊसाहेब नेटके, भाऊसाहेब बरकडे संदीप औटी, डी आर काकडे, विजय मुथा, सौ सुरेखा लकडे, प्राचार्य डॉ. सतिषचंद्र सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

COMMENTS