कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवार (दि.26) रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवार (दि.26) रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत स्कूल कनेक्ट कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी दिली आहे.
महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे प्लॅनिंग व डेव्हलोपमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची जागृती करण्यासाठी विद्यापीठाकडून तालुकानिहाय आयोजनानुसार सुशीलामाई काळे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी व प्रथम अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थी व पालक यांच्या करिता स्कुल कनेक्ट संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यशाळेसाठी प्रमुख व्याख्याते म्हणून कोपरगाव येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला भोर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वाणिज्य विभागाचे अभ्यास मंडळ सदस्य डॉ. संतोष पगारे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे भूगोल विभागाचे अभ्यास मंडळ सदस्य डॉ. गणेश चव्हाण उपस्थित राहणार आहे. या कार्यशाळेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत शैक्षणिक व्यवस्थेत झालेले बदल याबाबत कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले जाणार असल्याचे प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी सांगितले आहे.
COMMENTS