Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रवरेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात इन्स्पायर महाराष्ट्रचे आयोजन

प्रदर्शनात इस्रो आणि राष्ट्रीय संरक्षण संशोधन संस्थेचे शास्रज्ञ उपस्थित रहाणार

लोणी ः प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्याा लोणी येथी प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात इन्स्पायर महाराष्ट्र - 2024 या तंत्रज्ञान परिसंवाद आ

15 हजारांचा गंडा घालणार्‍या भोंदूविरुद्ध कर्जत पोलिसात गुन्हा
नगर शहर सहकारी बँकेसह 21 संस्थांच्या निवडणुका थांबल्या
डाऊच खुर्द साठवण तलाव एमएसआरडीसीकडून हस्तांतरित व्हावा

लोणी ः प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्याा लोणी येथी प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात इन्स्पायर महाराष्ट्र – 2024 या तंत्रज्ञान परिसंवाद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून  यासाठी भारतीय अवकाश संस्था (इस्रो) राष्ट्रीय संशोधन संस्था, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ  व संशोधक उपस्थित रहाणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.गुल्हाणे यांनी दिली.

याप्रसंगी महाविद्यालयातील संशोधन व विकास विभागाचे डीन तसेच प्रिझम फॉर्म या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कुरकुटे यांनी माहीती देतांना सांगितले की, संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी यांचे अंतर्गत प्रवरा रिसर्च इनोव्हेशन स्टार्टअप अँड मिडीयम इंटरप्रायजेस (प्रिझम) फोरमची स्थापना करण्यात आली असून या कंपनीमार्फत इन्स्पायर महाराष्ट्र – 2024 या कार्यक्रमाचे गुरुवार 4 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता भारतीय अवकाश संस्था (इस्त्रो) हैदराबाद येथील सह संचालक डॉ.जी.श्रीनिवास राव यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या प्रसंगी राष्ट्रीय संरक्षण संशोधन संस्थेचे श्री.जितेंद्र जाधव, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील माजी विद्यिर्थी आणि सी-डॅक इंटरनॅशनलचे रोहिता आणि डी.एस.आर.राजू दिल्लीचे पोलीस प्रमुख श्रीमती सुमन नलवा, गुंतवणूक व तंत्रज्ञान विषयक सल्लागार  डॉ.कृष्णा यार्लीगड्डा, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक श्री.शिवाजीराव जोंधळे,सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एस.एन.हिरेमठ आदी उपस्थित असणार आहेत.

COMMENTS