Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेन मेडिसिन’ या विषयवार रविवारी एक दिवसीय परीषदेचे आयोजन

आयएमए व आयएसए अणि एसएमबीटि यांच्‍यातर्फे उत्तर महाराष्ट्रात प्रथमच आयोजन

नाशिक - पाठ किंवा डोकेदुखीपासून अन्‍य गंभीर स्‍वरुपाच्‍या आजारांमध्ये वेदनांचा अनुभव रुग्‍णांना येतो. रुग्‍णांच्‍या वेदना प्रभाविपणे क्षमवत आधुनि

जालन्याच्या ’मत्स्योदरी’ देवीच्या मंदिरात चोरी
महात्मा बसवेश्वर, राजीव गांधी यांचे पुतळे हटवू नयेत
मुंबईत तब्बल 6 हजार 347 नवे कोरोना रुग्ण l DAINIK LOKMNTHAN

नाशिक – पाठ किंवा डोकेदुखीपासून अन्‍य गंभीर स्‍वरुपाच्‍या आजारांमध्ये वेदनांचा अनुभव रुग्‍णांना येतो. रुग्‍णांच्‍या वेदना प्रभाविपणे क्षमवत आधुनिक उपचार पद्धतीचा अवलंब व्‍हावा, यासाठी ‘पेन मेडिसिन ः बेसिक्स टु एडवान्स या संकल्‍पनेवर एक दिवसीय परीषद आयोजित केली आहे. इंडियन मेडिकल असेासिएशनची नाशिक शाखा आणि इंडियन सोसायटी ऑफ अनेस्‍थेसियालॉजीची नाशिक शाखा अणि एसएमबीटि रुग्णालय यांच्या  संयुक्‍त विद्यमाने येत्‍या रविवारी (दिनांक १० सप्‍टेंबर) शालिमार येथील आयएमए सभागृहात ही परीषद होईल, अशी माहिती आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष व परीषदेच्‍या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.विशाल गुंजाळ यांनी पत्रकार परीषदेत दिली.

आयएमए सभागृह येथे झालेल्‍या या पत्रकार परीषदेला आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष आणि आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.विशाल गुंजाळ, आयएसएचे अध्यक्ष डॉ.देवेंद्र चौधरी, आयएमएच्‍या सचिव डॉ.माधवी गोरे-मुठाळ, आयोजन समितीचे सचिव डॉ.विक्रम सोनवणे, आणि आयएसए नाशिकचे सचिव डॉ.महेंद्र गुप्ता व इतर डॉक्‍टर उपस्‍थित होते.

डॉ.देवेंद्र चौधरी म्‍हणाले,  उत्तर महाराष्ट्राच्‍या स्‍तरावर अशा स्‍वरुपाची पहिली परीषद होत असून, डॉक्‍टरांना या परीषदेत निशुल्‍क सहभागी होता येणार आहे. परीषदेच्‍या माध्यमातून सहभागी डॉक्‍टरांना वेगवेगळ्या आजारांतील वेदनांचे विविध टप्पे व त्‍यावरील उपचार पद्धती यासंदर्भात तज्ञ मार्गदर्शन करतील. रुग्‍णांवर प्रभावी उपचार करता यावे, यासाठी डॉक्‍टरांना ही परीषद मार्गदर्शक ठरेल.

डॉ.माधुरी गोरे-मुठाळ म्‍हणाल्‍या, इंडियन मेडिकल असेासिएशनची नाशिक शाखा आणि इंडियन सोसायटी ऑफ अनेस्‍थेसियालॉजीच्‍या नाशिक शाखेच्‍या सहकार्याने पेन मेडिसिन ही परीषद येत्‍या रविवारी (१० सप्‍टेंबर) सकाळी ८.३० पासून तर दुपारी १ वाजेदरम्‍यान शालिमार येथील आयएमए सभागृह येथे होणार आहे.

डॉ.महेंद्र गुप्ता म्‍हणाले, परीषदेमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वक्‍ते मार्गदर्शन करतील. यामध्ये न्‍युकॅस्‍टल (युके) येथील डॉ.शैलेश मिश्रा, मुंबईतील डॉ.कैलाश कोठारी, इंदोरचे डॉ.प्रवेश कांठेड, मुंबईचे डॉ.जितेंद्र जैन, नागपूरच्‍या डॉ.सुनिता लवंगे, ठाण्याच्‍या डॉ.मंजिरी रानडे, कल्‍याणचे डॉ.प्रकाश देशमुख, मुंबईचे डॉ.नाना मोरकाणे, डॉ.सिद्धार्थ वर्मा तसेच पुण्यातील डॉ. उत्तम सिद्धये आणि डॉ. हेमंत क्षीरसागर यांचा सहभाग असेल.

नागरिकांसाठी ‘पेन मेडिसिन प्रदर्शन’ – परीषदेनिमित्त सर्वसामान्‍य नागरिकांसाठी ‘पेन मेडिसिन  प्रदर्शन’ आयोजित केले आहे. या प्रदर्शनातून नागरिकांना वेगवेगळ्या स्‍वरुपाच्‍या वेदनांची कारणे, व परिणाम, उपचार पद्धती आदींविषयी माहिती जाणून घेता येणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जुन भेट द्यावी, असे आवाहन डॉ.विशाल गुंजाळ व टीमने केले आहे. (वेळ:- 10 september to 20 september सकाळी 11 ते 6 – आयएमए सभागृह, शालिमार,  नाशिक) 

या विषयावर होणार परीषदेत चर्चा – वेदनाशामक औषधोपचाराचे ऐकविसाव्‍या शतकातील महत्त्व, वेदनाशामक औषधे ः शिकवण आणि संधी, पाठीचे दुखणे- पेन फिजिशियन यांचा दृष्टीकोन, कर्करोगग्रस्‍तांमधील वेदना, खांदे दुखीचे व्‍यवस्‍थापन, कॉम्‍प्‍लेक्‍स रिजनल पेन सिड्रोम्‍स आदी विषयांवर परीषदेत चर्चा केली जाणार आहे.

COMMENTS