अहमदनगर प्रतिनिधी - श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्री साई सच्चरित या पवित्र ग्रंथाची व्दारकामाईतून गुरुस
अहमदनगर प्रतिनिधी – श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्री साई सच्चरित या पवित्र ग्रंथाची व्दारकामाईतून गुरुस्थानमार्गे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी वीणा, वैद्यकीय संचालक ले.कर्नल डॉ.शैलेश ओक व संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी यांनी श्रींची प्रतिमा घेवुन मिरवणूकीत सहभाग घेतला. याप्रसंगी संस्थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, सौ.मालती यार्लगड्डा, सौ.मिनाक्षी सालीमठ, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी कावडी पुजन करताना संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्यांची सुविद्य पत्नी सौ.मालती यार्लगड्डा, तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मिनाक्षी सालीमठ आणि प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव हे उपस्थित होते.
COMMENTS