Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेमध्ये राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन; सातशेहून अधिक स्पर्धकांचा सहभाग

संगमनेर/प्रतिनिधी ः महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने आजपासून 19 ऑगस्टपर्यंत संगमनेरात चौथ्या राज्यस्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे आ

मनपा व जिल्हा परिषद कर्मचारी निवडणुकीत रंगणार
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |
प्रवरेच्या कृषी व संलग्न शास्त्र संस्थेत विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीचे धडे

संगमनेर/प्रतिनिधी ः महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने आजपासून 19 ऑगस्टपर्यंत संगमनेरात चौथ्या राज्यस्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय पातळीवरील ही स्पर्धा मुला-मुलींच्या स्वतंत्र प्रत्येकी दोन गटात होणार असून त्यात अजिंक्यपद मिळवणार्या खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील योगासन खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक व व्यवस्थापक असे साडेसातशेहून अधिकजण संगमनेरात दाखल झाल्याची माहिती महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी दिली.
संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये आजपासून शनिवारपर्यंत (दि.19) राज्यस्तरीय योगासन स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमधील सातशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले असून त्यांच प्रशिक्षक व व्यवस्थापक अशा एकूण साडेसातशे जणांच्या निवासाची व्यवस्थाही ध्रुव ग्लोबलमध्ये करण्यात आली आहे. आज सायंकाळी विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून यावेळी राज्य योगासन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, सचिव राजेश पवार, तांत्रिक समितीचे संचालक सतीष मोहगावकर, स्पर्धेचे संचालक महेश कुंभार, खजिनदार कुलदीप कागडे व स्पर्धा व्यवस्थापक सचिन जोशी आदी उपस्थित राहणार आहेत.

COMMENTS