Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीत राज्यस्तरीय भीम काव्यस्पर्धेचे आयोजन

राहुरी ः विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी निळा झेंडा कॉर्नर, प्रगती विद्यालय, राहुरी येथे सकाळी 10 ते 3 वाजेपर

संगमनेर युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निखील पापडेजा
पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वावर जनतेचा विश्‍वास ः ना. राधाकृष्ण विखे पाटील
नामदार आदित्य ठाकरे यांनी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

राहुरी ः विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी निळा झेंडा कॉर्नर, प्रगती विद्यालय, राहुरी येथे सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजक रिपाइं-शिक्षक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अनुसंगम शिंदे यांनी दिली.
       या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार पाच हजार रूपये, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, द्वितीय पुरस्कार तीन हजार रूपये, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, तृतीय पुरस्कार रूपये दोन हजार रूपये सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल, दोन उत्तेजनार्थ बक्षिसे-प्रत्येकी रूपये एक हजार सन्मानपत्र, सन्माचिन्ह, शाल असे पुरस्कार असतील. सहभागी सर्व कवींना सहभाग सन्मान पत्र,सन्मानचिन्ह दिले जाईल.प्रथम पुरस्कार प्राप्त कविला भीमरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. भीमकाव्यस्पर्धा यशस्वी करण्यासाठी रिपाइं जिल्हा अध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात, रिपाइं राहुरी तालुका अध्यक्ष विलासनाना साळवे, शिक्षक नेते बाबासाहेब बोडखे, सामाजिक कार्यकर्ते शिरीषराव गायकवाड, वंचितचे राहुरी तालुका उपाध्यक्ष गणेश पवार, विकास अधिकारी अजिंक्य शिंदे, धम्मदिप युवा मंचचे सनी साळवे,भूषण साळवे, सामाजिक कार्यकर्ते योगेश सेठ चुत्तर, सतिष शहाणे, महंमद इराणी, निसार मामु पिंजारी, धनंजय पुरोहित, भाऊसाहेब शिरसाठ, पंकज लगे आदींचे योगदान होत आहे. तरी या भीमकाव्य स्पर्धेत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन आयोजक अनुसंगम शिंदे यांनी केले.

COMMENTS