Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साईनगरीत 29 व 30 एप्रिलला शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन ः डॉ. संजय मोरे

राहाता : येत्या 29 व 30 एप्रिल रोजी साईनगरीत 64 व्या साईबाबा राष्ट्रीय महिला व पुरूष वरिष्ठ शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती इंड

शेवगाव शहरात सायकल फेरी काढून मतदान जागृती अभियान
खेड महाविद्यालयात विदेशी पाहुण्यांनी घेतली धृपद कार्यशाळा 
कत्तलखाने पुन्हा सुरू होणार नाही, याची खबरदारी घ्या : नगराध्यक्ष वहाडणे

राहाता : येत्या 29 व 30 एप्रिल रोजी साईनगरीत 64 व्या साईबाबा राष्ट्रीय महिला व पुरूष वरिष्ठ शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती इंडीयन बॉडी बिल्डींग अ‍ॅण्ड फिटनेस फेडरेशनचे सरचिटनीस डॉ. संजय मोरे यांनी दिली. शिर्डी साई भारत श्री किताबाने विजेत्याला गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत देशातील 28 राज्यांमधून जवळपास सातशे पुरूष व महिला स्पर्धक सहभागी होणार आहेत.

येथील राष्ट्रवादीचे नेते व उद्योजक संदीप सोनवणे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. या स्पर्धेबाबत डॉ. मोरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी शिर्डीतील कार्यक्रमाचे आयोजक संदीप सोनवणे फेडरेशनचे पदाधिकारी संजय सोळंकी, अजय खानविलकर, मदन कडू, राजेश सावंत, स्थानिक पदाधिकारी नारायण पाडेकर, महेश गोसावी, निखील बनसोडे, बापु काळे, लोकेशकुमार यांची प्रमुख उपस्थीती होती. शिर्डीजवळील पालखी निवारा येथे 29 व 30 एप्रील रोजी या स्पर्धा होतील. खेळाडूंची निवास व भोजनाची निशुल्क व्यवस्था करण्यात आलेली आहे सतरा वजनी गटात या स्पर्धा होत आहेत. यात सेना दलासह विविध विभागातील खेळाडू सहभागी होणार आहेत. 29 तारखेला खेळाडूंचे रजिस्ट्रेशन करून वजने घेण्यात येतील. 30 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत अविरत या स्पर्धा सुरू राहतील. विजेत्यांना जवळपास वीस लाख रूपयांची बक्षीसे वितरीत करण्यात येणार आहे. या खेळाच्या माध्यमातून आपल्यासह जवळपास 53 खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याचेही डॉ़ संजय मोरे यांनी सांगितले. ग्रामिण भागातील खेळाडूंना जास्तीत जास्त स्पर्धेचा लाभ घेता यावा, ग्रामिण भागात या खेळाचा प्रचार प्रसार व्हावा, तरुणाईला शरिराचे आकर्षण व व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी शिर्डीसारख्या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन केल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेनंतर स्थानिक खेळाडू लोकेशकुमार याने शरीर सौष्ठवाची प्रात्यक्षिके सादर केली.

COMMENTS