कोपरगाव शहर ः कोपरगाव येथील बजाज कोचिंग क्लास येथे नुकतीच अवयवदान कार्यशाळा पार पडली. या कार्य शाळेला प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते व अव

कोपरगाव शहर ः कोपरगाव येथील बजाज कोचिंग क्लास येथे नुकतीच अवयवदान कार्यशाळा पार पडली. या कार्य शाळेला प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते व अवयवदान समुपदेशन डॉ. अशोक गावित्रे यांनी मार्गदर्शन केले. डॉ गावित्रे हे फेडरेशन ऑफ बॉडी अँड ऑर्गन डोनेशन व मोहन फाउंडेशन च्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून प्रबोधन करत असून त्यांच्याच प्रयत्नतुन शिर्डी सस्थान येथे लवकरच आय बँक सुरु होत आहे.
या प्रसंगी त्यांनी अवयवदानाची संपूर्ण प्रक्रिया त्यासाठी लागणारे फॉर्म कसे व कुठे भरावे, अवयवदानाची देश, राज्य, जिल्हा पातळीवर याची आकडेवारी तसेच पर्यावरणाचा होणारा र्हास आपण कसा कमी करू शकतो या संदर्भातील अंधश्रद्धा याबद्दल संपूर्ण माहिती दिली तसेच उपस्थिताच्या संपूर्ण शंकाचे निरसन केले. तसेच मानवी देहाची माती किव्हा राख होण्यापेक्षा त्याचा इतराना उपयोग व्हावा मृत्यूनंतर देखील जीवंत कस रहावं, याबद्दल प्रबोधन केले तसेच या अवयवदानाच्या चळवळीत प्रत्येकांनी सहभागी होण्याच आवाहन त्यांनी केले. तर उपस्थित असलेले सुप्रसिद्ध लेखक व निवेदक सुहासभाई मुळे यांनी देखील ज्ञानेद्रिय व कर्मेंद्रिय याविषयी सखोल माहिती दिली. या प्रसंगी गोदावरी खोरे तालुका दुध उत्पादक संघाचे चेअरमन राजेशआबा परजणे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेसाठी सी.आर.बजाज व राहुल बजाज यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच या प्रसंगी नाईक, घाटे, जोगनपुत्र देशपांडे, शिवकाल भंडारी, अमृतकर, सुशीला बजाज आदी मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS