Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साई समाधीवर सर्वसामान्य साई भक्तांना वस्त्रचढवता येणार- राहुल जाधव

 अहमदनगर प्रतिनिधी - श्री साईबाबांच्‍या दैनंदिन तीन्‍ही आरतीसाठी वस्‍त्र चढविण्‍याकरीता प्रत्‍येक गुरुवारची काकड आरतीचे व प्रत्‍येक रविवारची माध

पेट्रोल-डिझेल महागले…चला घोड्यावर ; काँग्रेसचे नगरमध्ये अभिनव आंदोलन
गुटका साठा प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल
शेवगाव दंगलप्रकरणी सूड भावनेतून गुन्हे दाखल

 अहमदनगर प्रतिनिधी – श्री साईबाबांच्‍या दैनंदिन तीन्‍ही आरतीसाठी वस्‍त्र चढविण्‍याकरीता प्रत्‍येक गुरुवारची काकड आरतीचे व प्रत्‍येक रविवारची माध्‍यान्‍ह आरतीचे राखीव ठेवलेले स्‍लॉट रद्द करुन आता भाविकांकरीता सोडत पध्‍दतीने उपलब्‍ध करुन देण्‍याचा निर्णय तदर्थ समितीने घेतला असून भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्‍यावा असे आवाहन संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केले.श्री.जाधव म्‍हणाले, भाविकांना श्री साईबाबांच्‍या आरती प्रसंगी वस्‍त्र चढवण्‍याची इच्‍छा असते. याकरीता संस्‍थानच्‍या वतीने सन २०१६ मध्‍ये कार्यपध्‍दती ठरवुन दैनंदिन ०३ आरत्‍यांसाठी भाविकांचे वस्‍त्र चढवणे सुरु करण्‍यात आले. तसेच दिनांक २३.०५.२०१७ रोजी झालेल्‍या व्‍यवस्‍थापन समितीच्‍या सभेत समितीच्‍या सदस्‍यांना प्रत्‍येक गुरुवारची काकड आरती व प्रत्‍येक रविवारची माध्‍यान्‍ह आरती करीता राखीव वस्‍त्र ठेवणेबाबत निर्णय घेण्‍यात आला होता. परंतु दैनंदिन तीन्‍ही आरत्‍याचे सर्वच दिवस फक्‍त भाविकांना उपलब्‍ध करुन देण्‍याच्‍या दृष्‍टीने संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधिश सुधाकर यार्लगड्डा व समिती सदस्य तथा जिल्‍हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी अधोरेखीत केले. त्‍यानुसार 31 डिसेंबर 2022 च्या सकाळी झालेल्या सभेत गुरुवार व रविवार या दिवशी राखीव ठेवलेल्‍या स्‍लॉटला देखील ड्रॉ पध्‍दतीने भाविकांचे वस्‍त्र चढवण्‍याचा लाभ मिळनार आहे.

COMMENTS