Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साळेगाव येथील शंकर विद्यालयात मौखिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

केज प्रतिनिधी - राष्ट्रीय मौखिक आरोग्य अभियान व पीट अँड फिशर पायलट प्रोजेक्ट अंतर्गत आज दिनांक 22 जुलै रोजी शंकरविद्यालय, साळेगाव येथे जाऊन उपस्

भारतरत्न स्व इंदिराजी गांधी ह्या देशाचे सर्वात खंबीर नेतृत्व – ना थोरात
ईव्हीएम एक ब्लॅक बॉक्स : राहुल गांधी यांचा सवाल
फरार व्यापारी मेहुल चोक्सी अखेर अटकेत

केज प्रतिनिधी – राष्ट्रीय मौखिक आरोग्य अभियान व पीट अँड फिशर पायलट प्रोजेक्ट अंतर्गत आज दिनांक 22 जुलै रोजी शंकरविद्यालय, साळेगाव येथे जाऊन उपस्थित अंदाजे 350 पेक्षा जास्त विद्यार्थी, विद्यार्थिनींची दंत व मुख तपासणी करून त्यांना मौखिक आरोग्याची घ्यावयाची काळजी जसे की,नियमित दोन वेळा ब्रश करणे,गोड,चिकट, चॉकलेट,जंक फूडइत्यादी पदार्थांपासून दूर राहणे आणी ब्रश करण्याची योग्य पद्धत इत्यादी बाबी बद्दल सविस्तर मार्गदर्शन केज शहरातील सर्वात जुने आणी उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ दंतशल्य चिकित्सक डॉ. रमण दळवी यांनी केले तसेच गरजू 11 विद्यार्थ्यांची पिट फिशर सिलंट ट्रीटमेंट देखील शाळेतच केली.तसेच दैनंदिन आरोग्य व संतुलित आहार याचे महत्त्व समुपदेशक सिता गिरी मॅडम यांनी सविस्तर समजावून सांगितले तसेच जिल्हा रूग्णालय बीड चे दंत आरोग्य तज्ञ श्रीकांत उजगरे यांचे मोलाचे सहकार्य सदर कार्यक्रमास लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपजिल्हा रुग्णालय केज चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोळंके सर यांचे मोलाचे मार्गदर्शन होते तर शाळेचे मुख्याध्यापक आणी शिक्षक यांनी यशस्वी आयोजना साठी मदत केली.डॉ.रमण दळवी आणि त्यांची टीम यासाठी परिश्रम घेत आहे.

COMMENTS