Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विरोधी पक्ष सत्तेसाठी हपापलेले – विठ्ठल पवार राजे

शेतकर्‍यांच्या हिताच्या बाजून राहण्याची वेळ

पुणे/प्रतिनिधी ः राज्यातील शेतकर्‍यांच्या हितासाठी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने कायदेशीर मार्गाने लढा उभारत राज्यातील कृषी पंप धारक शेतकर्‍य

राजन पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, उमेश पाटलांचा जोरदार पलटवार
कोपरगावात ग्रामदैवत हनुमान जन्मोत्सव उत्साहात
लस न घेणाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश नाही

पुणे/प्रतिनिधी ः राज्यातील शेतकर्‍यांच्या हितासाठी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने कायदेशीर मार्गाने लढा उभारत राज्यातील कृषी पंप धारक शेतकर्‍यांच्या 39 हजार कोटी रुपयांच्या बेकायदेशीर विज बिल वसुली रोखली आणि यापुढे कृषी पंप धारक शेतकर्‍यांच्या पंपांसाठी सलग व अखंडित वीज पुरवठा करणे, सक्तीची वीज बिल वसुली करू नये व आणि थकबाकीसाठी शेतकर्‍यांच्या कृषी पंपाचा विद्युत पुरवठा यापुढे कधीही खंडित करू नये, शेतकर्‍यांना छळू नये असे स्पष्ट आदेश राज्य अन्न आयोग व मुंबई उच्च न्यायालय यांच्या निर्णयाने महाराष्ट्र राज्यातील विरोधी पक्ष नेते देखील हादरलेले आहेत. कारण विरोधी पक्ष सत्तेसाठी हपापलेले असल्याची टीका शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व याचिकाकर्ते विठ्ठल पवार राजे यांनी केली आहे.
राज्याचे सध्याचे विरोधी पक्ष नेते तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी शेतकर्‍यांची शेतकर्‍यांचे विजेचे बिल ब्रह्मदेव आला तरी माफ होणार नाही अशी डरकाळी फोडली होती! त्यावर शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने ब्रह्मदेवाचा बाप आला तरी शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची बेकायदेशीर विज बिल वसुली देणार नाही असे जाहीर आव्हान करत., न्यायालयीन लढा उभारला आणि शेतकर्‍यांच्या हितासाठी ऐतिहासिक निर्णय मिळवला त्या निर्णयाचे स्वागत राज्य सरकारचे विद्यमान मुख्यमंत्री यांनी नंदुरबार येथील जाहीर सभेत राज्य अन्न आयोगाने, यापुढे शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची सक्तीने वीज बिल वसुली करू नये व शेतकर्‍यांना सलग विज पुरवठा करावा या निर्णयाचे स्वागत करत आदेशाची अंमलबजावणी करू असा शब्द जाहीर सभेत दिलेला होता व आहे. राज्य अन्न आयोग मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संघटनेने राज्यातील विरोधी पक्ष नेते सर्व पक्षाचे आमदार खासदार अध्यक्ष व विद्यमान सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वीज मंत्री व सहकार मंत्री यांना पत्र लिहून शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे विधीज्ञ हायकोर्टाचे वकील एडवोकेट अजय गजानन तल्हार व शिल्पाताई गजानन तल्हार यांच्या वकील टीमने संघटनेच्या वतीने शेतकर्‍याची जोरदार बाजू मांडून तीन चार वेळेस झालेल्या सुनावणीमध्ये शेतकर्‍यांच्या वीज बिल वसुलीमध्ये काही करोड रुपयांचा अधिकचा घोटाळा उघडकीस आणत बेकायदेशीर विज बिल रद्द करून देशाची व राज्याची अन्नसुरक्षा धोक्यात येऊ नये तसेच शेतकर्‍यांच्या हिताच्या निर्णयाची मागणी केली ती माननीय राज्य अन्न आयोग यांनी मान्य करत शेतकर्‍यांच्या बाजूने निकाल दिला. व त्या निकालाची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला देखील तसे आदेश दिलेले होते. शेतकर्‍यांनी आणि सर्वसामान्य कष्टकरी कामगारांनी ही बाब लक्षात घ्यावे की आता विरोधी पक्ष हयात राहिलेला नसून ही सत्तेसाठी हपापलेले पिपासु आहेत! त्यांना यापुढे राजकारणामध्ये शेतकरी कष्टकरी कामगारांनी कुठेही उभा करू नये आम्ही त्या विरोधी पक्ष नेते व अध्यक्ष यांच्या नपुंसकृत्याचा जाहीर निषेध करतो असे असे आव्हान अध्यक्ष अध्यक्ष व याचिकाकर्ते विठ्ठल पवार राजे यांनी केला आहे यावेळी संघटनेचे पुणे शहर जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर, बाळासाहेब वर्पे विठ्ठल पाटील लोखंडे दिलीप वर्पे गुलाबराव पाटील नंदकिशोर पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेत्यांची गुपचिळी धोकादायक – विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी होती की राज्यातील शेतकर्‍यांच्या हिताचा झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करा झलेल्या अधिवेशनामध्ये तसा शासन निर्णय परिपत्रक जाहीर करून यापुढे शेतकर्‍यांची सक्तीने वीज बिल वसुली करू नये, राज्यांना आयोगाच्या निर्णयानंतर कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करू नये व सलग वीज पुरवठा करावा असा निर्णय दिलेला असताना त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही  विरोधी पक्ष नेत्यांची असताना ते देखील मूग गिळून गप्प झाले आणि इळीमिरी गुपचिळी घेऊन बसलेले होते हे त्यांचं शेतकर्‍यांवरचं ढोंगी प्रेम संघटनेच्या लक्षात आल्याने संघटनेने राज्यभर शेतकरी संवाद यात्रा व परिषदा घेत अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त व सर्व संबंधित महसूल अधिकारी पोलीस अधिकार्‍यांना निर्णयाचे आदेश देत अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला सूचना करा अशा आशयाचा पत्रव्यवहार करत शेतकरी हितासाठी जनजागृती केलेली आहे त्यावेळी विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र मध्ये अस्तित्वात नसल्यामुळे संघटनेला ते काम करावे लागले आहे असा प्रहार संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी पत्रकारांसमोर केला आहे.

COMMENTS