Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परभणी, बीड प्रकरणी विरोधक आक्रमक ; पहिल्याच दिवशी सभागृहाचे कामकाज स्थगित

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून उपराजधानी नागपुरात सुरूवात झाली. मात्र परभणी येथे झालेला हिंसाचार आणि न्यायालयीन कोठडीत असले

सामूहिक बलात्कार करुन महिलेची हत्या
पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’चा थरार, कोयत्याने वार करत तरुणाची हत्या
वाद सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याची हत्या

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून उपराजधानी नागपुरात सुरूवात झाली. मात्र परभणी येथे झालेला हिंसाचार आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या तरूणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी तर, बीडमधील सरंपंचाचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. दोन्ही सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्त देत, सरकार कोणत्याही चर्चेला तयार असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
विधानसभेत काँगे्रस नेते नाना पटोले यांनी परभणी हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत त्यावर चर्चा करण्याची मागणी केली. यावेळी पटोले म्हणाले परभणी व बीड येथे घडलेल्या गंभीर घटना या खर्‍या अर्थाने राज्यात नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर घडल्या आहेत. काल परभणी येथे एक आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता मृत्युमुखी पडला. या घटनेमुळे आंबेडकरी जनतेत तीव्र संताप पसरला आहे. बीडच्याही घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. विधानसभा अध्यक्ष विरोधकांचे संरक्षक आहेत. त्यामुळे त्यांच्यामार्फतच जनतेला न्याय मिळेल. या प्रकरणी सरकारने उत्तर देण्याची तयारी दाखवावी. ही एक अत्यंत गंभीर बाब आहे. राज्यात परभणी व बीडच्या घटनेवरून लोकांमध्ये तीव्र चिड निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणावरील आपली भूमिका स्पष्ट करावी अशी आमची विनंती आहे, असे नाना पटोले हा मुद्दा अधोरेखित केले.
तर विधानपरिषदेत अंबादास दानवे म्हणाले की, बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार 3 आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. तसेच या घटनेत दोषी असलेल्या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केली. बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती आज 289 अनव्ये दानवे यांनी सभागृहात मांडली. या गंभीर हत्येत राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या जवळचे वाल्मीक कराड यांचा सहभाग असल्याची येथील गावकर्‍यांना शंका असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली. संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही दानवे यांनी विधान परिषद सभागृहात केली.

बीड, परभणीच्या घटना गंभीर; सरकारची चर्चेची तयारी : फडणवीस
बीड, परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. या घटनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानचा अपमान सहन केला जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांच्या संविधानानुसार अपेक्षित चर्चा सभागृहात झाली पाहिजे. संविधानाचा अपमान करणारा व्यक्ती मनोरुग्ण होता. विरोधी पक्षाने राजकारण न करता अशा घटना घडू नयेत यासाठी चांगल्या सूचना मांडाव्यात अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्ताव दरम्यान सविस्तर चर्चा करण्यात येईल असे स्पष्ट केले.

बीड जिल्ह्यात दोन वर्षात 32 लोकांचे खून : नाना पटोले
विधानसभेत बोलतांना नाना पटोले म्हणाले की, बीडमध्ये एका सरपंचाची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणी वाल्मिकी कराड या व्यक्तीचे नाव चर्चेत आहे, त्याचा मुख्यमंत्री फडणवीसांबरोबर फोटोही आहे, तो भाजपाचा कार्यकर्ता आहे का ? हे स्पष्ट करावे. बीड जिल्ह्यात मागील दोन वर्षात 32 हत्या झालेल्या आहेत. या सर्व हत्यांची चौकशी उच्च न्यायालयातील विद्यमान न्यायमूर्तीमार्फत केली जावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

COMMENTS