Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसी नेत्यांना संपवण्यासाठी विरोधक एकत्र

उपमुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका

वाशिम ः काही राजकीय पक्ष एकत्र येवून, ओबीसी समाजामध्ये फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजण्याचा एककलमी कार्यक्रम ते राबवू पाहत आाहे. मात्र त्यांनी आप

उद्धव ठाकरेंना मानसोपचारांची गरज
अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉट तातडीने दूर करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अतिवृष्टीग्रस्तांच्या भरपाई रकमेत दुपटीने वाढ

वाशिम ः काही राजकीय पक्ष एकत्र येवून, ओबीसी समाजामध्ये फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजण्याचा एककलमी कार्यक्रम ते राबवू पाहत आाहे. मात्र त्यांनी आपल्या स्वार्थासाठी ओबीसींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली. वाशिममध्ये ओबीसी जागर यात्रेच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, ओबीसी नेत्यांना संपवण्यासाठी 25 पक्ष एकत्र असे म्हणत काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच विरोधी पक्षांमुळेच जातीय तिढा वाढत आहे, विरोधक जाती जातींमध्ये भांडणे लावत आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला. कोणाचेही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिला होता त्याच प्रकारे मराठा आरक्षण करतात आमचं सरकार कटीबद्ध आहे आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी कंबर कसली आहे आणि निश्‍चितपणे मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आमचं सरकार थांबणार नाही, असा विश्‍वासही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

COMMENTS