Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

…तरच, मनुस्मृतीच्या विरोधात बहुजन समाज का हे समजेल ः खेडेकर

शालेय शिक्षण अभ्यासक्रमाबाबतच्या सूचना देण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी

अहमदनगर ः शालेय शिक्षणात मनुस्मृतीमधील सर्वात वाईट व सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक आर्थिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात द्वेषाची भावना अनावर करणा

शहरटाकळी येथे अखंड हरिनाम सप्ताहास 23 ला  प्रारंभ  
मद्यपी वाहन चालका विरूद्ध गुन्हा दाखल
काल्याच्या कीर्तनाने वीरभद्र महाराज यात्रेची सांगता

अहमदनगर ः शालेय शिक्षणात मनुस्मृतीमधील सर्वात वाईट व सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक आर्थिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात द्वेषाची भावना अनावर करणारे, चातुर्वर्ण्य व्यवस्था विश्‍लेषण व ब्राह्मण सर्वोच्च, अन्य पुरुष व महिला शुद्र व ताडनके अधिकारी इत्यादी कायदे बालपणीच्या शिक्षणात अगत्याने समाविष्ट केले जावेत. असे काही निवडक संस्कृत श्‍लोक व त्यांचा अत्यंत सरळ सोप्या मराठी लोक भाषेत अर्थ अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा. यामुळे बालकांना मनुस्मृतीच्या विरोधात बहुजन समाज कां आहे ? ते समजेल अशा आशयाचे पत्र मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना लिहिले आहे.

या पत्रात खेडेकर म्हणतात, भारत सरकारच्या नवीन शालेय शिक्षण अभ्यासक्रम 2020 ला आदर्श मानून महाराष्ट्र शासनाने नूतन शैक्षणिक धोरण तयार केले आहे. त्यावर नागरिकांचे आक्षेप 23 मे ते 3 जून 2024 दरम्यान ऑनलाईन मागवलेले आहेत. एकूण 330 ए 4 साईझचे पाने आहेत. एससीईआरटी संचालक राहूल रेखावार यांनी वरीलप्रमाणे पत्रक प्रकाशित केले आहे.
महोदय, आपणास कळविण्यात येते की महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आठवडा होत आला तरी इंटरनेट नेटवर्क नाही, नेटवर्क आले तर विज नाही, दोन्ही असले तरी सलग डिजीटल वाचन शक्य नाही, हार्ड कॉपी काढायला तालुका मुख्यालयी जावे लागते, तेथे तीन दिवस लागतात, शिक्षकांना सुट्टी आहे. मी 24 मे रोजी सांगितलेली हार्ड कॉपी काल मिळाली. तसेच शिक्षक वर्ग सुटीवर आहे. 330 पाने वाचण्यासाठी ऑनलाईन एक आठवडा लागतो . प्रचंड उन्हाळ्यात 4-5 जनांना एकत्रित येऊन चर्चा करणे शक्य नाही. या व अन्य कारणांमुळे आपणास विनंती आहे की कृपया सूचना पाठवण्यासाठी मुदत 10 ऑगस्ट 2024 करावी. तसेच महोदय, नवीन अभ्यासक्रमात मनुस्मृती मधील काही उच्च कोटीचे विचार असलेले श्‍लोक समाविष्ट करण्यात यावेत ही आपली सूचना आहे. तसेच नवीन पिढीतील युवकांना आपली सर्वोत्तम सर्वोच्च प्राचीन संस्कृती समजावी ही आपली भूमिका सकारात्मक आहे. महोदय, या पार्श्‍वभूमीवर माझी सूचना आहे की कृपया मनुस्मृती मधील सर्वसमावेशक सहिष्णू असे श्‍लोक अभ्यासक्रमात समाविष्ट करु नयेत.

ते सर्वच सनातन धर्म साहित्य उच्च शिक्षणात पदवी पदव्युत्तर पातळीवर भारतीय विद्या या नावाने अभ्यासक्रमात आहे. तसेच बहुजन समाजातील सर्व विद्यार्थ्यांना समता बंधुता लोकशाही स्वातंत्र्य मानवता समानता पोषणवाद इत्यादी मूल्ये शिकवण्याची गरज नाही. कारण ते सर्व सद्गुण बहुजनांच्या हृदयात उपजतच कोरलेले व पेरलेले असतात. महोदय, आमची इच्छा व सूचना आहे की कृपया शालेय शिक्षणात मनुस्मृती मधील सर्वात वाईट व सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक आर्थिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात द्वेषाची भावना अनावर करणारे , चातुर्वर्ण्य व्यवस्था विश्‍लेषण व ब्राह्मण सर्वोच्च, अन्य पुरुष व महिला शुद्र व ताडनके अधिकारी इत्यादी कायदे बालपणीच्या शिक्षणात अगत्याने समाविष्ट केले जावेत. असे काही निवडक संस्कृत श्‍लोक व त्यांचा अत्यंत सरळ सोप्या मराठी लोक भाषेत अर्थ अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा. यामुळे बालकांना मनुस्मृतीच्या विरोधात बहुजन समाज कां आहे ?? ते समजेल. कृपया हे अमानवी श्‍लोक समाविष्ट करावेत. जेणेकरून बहुजन बालकांना व युवकांना आपल्या गुलामीची कारणे समजतील. ते पेटून उठतील व नवीन सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्रांती घडवून आणतील. तसेच यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन का केले होते ? याबाबत सत्य कथन असावे. भारतीय संविधान व मनुस्मृती बद्दलचे तुलनात्मक दृष्टीने अत्यंत स्पष्ट विश्‍लेषण समाविष्ट करण्यात यावे. इतिहास शिकवताना काही शिक्षक छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान यांची भेट शिकवताना ज्याप्रमाणे मुलांच्या मनात मुसलमान द्वेष निर्माण करण्यात यशस्वी होतात. त्याचप्रमाणे मनुस्मृती मधील असे श्‍लोक शिकवताना बहुजन विद्यार्थी ब्राह्मणी वर्चस्ववादी व्यवस्थापन भस्मसात करण्यासाठी तयार झाले पाहिजे. कारण शिक्षणाचे उद्दिष्ट तेच आहे. महोदय, आम्हाला कल्पना आहे की मनुस्मृतीच नव्हे तर कोणताही ग्रंथ सरसकटपणे त्याज्य नसतो. त्यात थोडासा का होईना भाग विषारी व त्याज्य असू शकतो. अशा वेळी मध्यममार्ग काढून चांगले घ्यावे, ही आपली भूमिका चांगली आहे. परंतू अगदीं पंचामृत असलेल्या एखाद्या चविष्ट रुचकर जेवणात जर फक्त अर्धा चमचा अत्यंत जहरी सायनाईड विष टाकून ते जेवण घेतले तर जेवणारांचा मृत्यू अटळ आहे. म्हणून कृपया सर्वप्रथम सर्वच बालकांना जहरी विषाची ओळख करून देणे योग्य राहील असे मत आहे. महोदय, महाराष्ट्रातील ज्येष्ठ प्रबोधनकार स्मृती शेष केशव सीताराम ठाकरे म्हणायचे की,  काही सनातनी ब्राह्मण सांगतात की सनातन धर्मात (मनुस्मृतीमध्ये) काही बाबी चांगल्या आहेत. त्यांचा हा प्रतिवाद म्हणजे  संडासच्या टाकीत पडलेला एखादा शेंगदाणा शोधण्याचा प्रयत्न आहे. ज्यांना अशा टाकीत पोहायचे असेल त्यांनी तसे करावे. (संदर्भ-देवळांचा धर्म व धर्माची देवळे) अलीकडच्या काळात मूळ मनुस्मृती मधील बरेचसे श्‍लोक पुनर्लेखन केले आहेत. मूळ बापटांनी केलेला मराठी अनुवादही बदलला आहे. महोदय, आमची विनंती आहे की कृपया शालेय जीवनातील प्रत्येक विषयात बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरेल असे साहित्य समाविष्ट करावे. तरी कृपया गंभीरपणे विचार करून योग्य निर्णय घ्यावा ही विनंती आहे.

मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती.. विद्यार्थ्यांना मोफत द्या – मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती व बहुजनांची गुलामगिरी लेखक डॉ. आ. ह. साळुंखे हे पुस्तक सर्वच विद्यार्थ्यांना मोफत संदर्भ ग्रंथ म्हणून देणे. अथवा निर्णय होईपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना पूर्वतयारी म्हणून मोफत द्यावे.

COMMENTS