Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चुकीचे काम करणाराच माफी मागतो : मोदींच्या माफीनाम्यावर राहुल गांधींची टीका

सांगली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मादी मागितली होती त

14 उपप्रकल्प उभारणीसाठी 21 कोटींचे अनुदान
आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षेसाठी दोन वर्षे मुदतवाढ
विद्युत  वितरणचा लहरी कारभार दीडशे गावे अंधारात

सांगली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मादी मागितली होती त्याचा समाचार घेतला. राहुल गांधी म्हणाले की, पतंगराव कदम यांनी 60 वर्षे समाजकारण केले. पण केव्हाही माफी मागितली नाही. कारण त्यांनी कोणतेही चुकीचे काम केले नाही. म्हणजे चुकीचे काम करणारा माणूसच माफी मागतो. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली. मोदींनी माफी का मागितली याची वेगवेगळी कारणे असू शकतात. पहिले कारण म्हणजे या पुतळ्याचे काम संघाच्या कार्यकर्त्याला कंत्राट देण्याचा त्यांना पश्‍चाताप असावा. त्यामुळे मोदींनी माफी मागितली असावी. दुसरे कारण म्हणजे पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार किंवा चोरी झाली असावी. कदाचित त्यामुळे मोदींनी माफी मागितली असावी. तिसरे कारण म्हणजे, त्यांनी महाराजांच्या सन्मानार्थ पुतळा उभा केला, पण ती फार काळ टिकली नाही म्हणून त्यांनी माफी मागितली असावी, असे राहुल गांधी म्हणाले.

COMMENTS