Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी केवळ 31.74 टक्के मतदान

मुंबई : राज्यातील अंधेरी पूर्व’ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत झालेल्या या मतदान प्रक

तुमचे आजचे राशीचक्र सोमवार, ०४ एप्रिल २०२२ l पहा LokNews24
टायर फुटल्याने कराड शहरात ऊसाचा ट्रक पलटी
लसीच्या तुटवडयामुळे फाशी घ्यावी का? केंद्रीय मंत्र्यांचा उद्दाम सवाल; तीन महिन्यांतव 216 कोटी डोस उपलब्ध होणार

मुंबई : राज्यातील अंधेरी पूर्व’ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत झालेल्या या मतदान प्रक्रियेत 31.74 टक्के मतदान झाले असून सर्व प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली. अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरीत पोटनिवडणूक लागली.
भाजपने ऋतुजा लटकेंविरोधात मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्यामुळे निवडणूक चर्चेत आली होती. मात्र राज ठाकरेंसह शरद पवारांनी विनंती केल्यानंतर भाजपने अंधेरीच्या मैदानातून माघार घेतली होती. त्यानंतर ऋतुजा लटके यांच्यासमोर 6 अन्य उमेदवारांचे आव्हान आहे. अंधेरी पूर्व या मतदारसंघातील सर्व 256 मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजतापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीस म्हणजे सकाळी 11 वाजेपर्यंत 9.72 टक्के मतदानाची टक्केवारी होती. दुपारी 1 वाजेपर्यंत 16.89 टक्के मतदान झाले. तर दुपारी 3 वाजेपर्यंत 22.85 टक्के; सायंकाळी 5 वाजेपर्यंत 28.77 टक्के मतदान झाले. तर मतदान प्रक्रियेच्या अखेरीस अर्थात मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मतदारसंघात सुमारे 31.74 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी दिली. या 256 मतदान केंद्रांपैकी मरोळ एज्युकेशन अकादमी हायस्कूल येथे मतदान केंद्र क्रमांक 53 मध्ये सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. या मतदान केंद्रांमध्ये एकूण 1418 मतदारांमध्ये 726 महिला मतदार असल्याने आणि महिला मतदारांची ही संख्या अंधेरी पूर्व मतदारसंघात सर्वाधिक असल्याने या ठिकाणीच सखी मतदान केंद्र तयार करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी सांगितले. आजच्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने मतमोजणी रविवारी 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता पासून सुरू होणार आहे.

COMMENTS