Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जमिनीच्या वादातून एकाला मारहाण

देवळाली प्रवरा ः तुझे क्षेत्र मोजून घे म्हणाल्याचा राग येवून एकाच्या डोक्यात काठी मारून त्याचे तंगडे तोडण्याची धमकी देण्याचा प्रकार देवळाली प्रवर

Kopardi Rape And Murder Case : कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणाची सुनावणी तहकूब
बदलीच्या ठिकाणी हजर न होणार्‍या अधिकार्‍यांची सेवा खंडित करणार
जामखेड बाजार समितीत ईश्‍वर चिठ्ठीचा कौल भाजपला

देवळाली प्रवरा ः तुझे क्षेत्र मोजून घे म्हणाल्याचा राग येवून एकाच्या डोक्यात काठी मारून त्याचे तंगडे तोडण्याची धमकी देण्याचा प्रकार देवळाली प्रवरा शिवरात घडला आहे. याबाबत, केरबा रामचंद्र बोरकर, वय-71, धंदा-शेती, राहणार बिरोबावाडी, देवळाली प्रवरा ता. राहुरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काल 31 मे रोजी सायं. 5.30 ला आपण देवळाली प्रवरा शिवारातील शेती गट नं. 589 मधील उसाच्या शेतात पाणी भरत असताना अमोल साठे हा तेथे आला व त्याने सतीश विठ्ठल पुंड यास विकलेले 10 गुंठे क्षेत्र तो मोजून देत होता. तेव्हा साठे हा म्हणाला की, तू शेतजमिनीचा सामाईक बांध फोडलेला आहे. असे म्हणून शिवीगाळ करू लागला. तेव्हा आपण त्यास म्हणालो, तुला जर तसे वाटत असेल तर तू तुझे क्षेत्र मोजून घे,असे म्हणाल्याचा राग आल्याने त्याने त्याच्या हातातील ’काठी डोक्यात मारून, खाली पाडून मारहाण करत पुन्हा सामाईक बांधावर दिसला तर तंगडे तोडून टाकील, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर फिर्यादीवरून अमोल भानुदास साठे, रा. देवळाली प्रवरा याच्याविरूद्ध भादंवि कलम 323, 324, 504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.

COMMENTS