Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एक रुपयात पीकविमा योजना शेतकर्‍यांसाठी लाभदायक

पीकविम्यासाठी अंतिम मुदत 15 जुलैपर्यंत

कोपरगाव शहर : निसर्गाच्या लहरीपणाच्या अतिवृष्टी, वादळ, पूर, पावसाचा खंड, पीक काढणी पश्‍चात नुकसान आदि नैसर्गिक संकटामुळे अनेक शेतकर्‍यांनी लाखो र

निःस्वार्थी भावनेने सेवा करणारे विश्‍वनाथ सुकळे एक आदर्श प्रा.डॉ.किरण मोगरकर यांचे प्रतिपादन
फोफसंडीत विशेष गुणगौरव व काव्यमैफल कार्यक्रम सोहळा उत्साहात
रायगडावर अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा

कोपरगाव शहर : निसर्गाच्या लहरीपणाच्या अतिवृष्टी, वादळ, पूर, पावसाचा खंड, पीक काढणी पश्‍चात नुकसान आदि नैसर्गिक संकटामुळे अनेक शेतकर्‍यांनी लाखो रुपये खर्च करत शेतात उभे केलेल्या पिकांचा हाता तोंडाशी आलेला घास हातातून निसटून जातो यामुळे शेतकर्‍यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. मात्र शेतकर्‍यांसाठी एक रूपयांत पीकविमा लाभदायक ठरतांना दिसून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील झालेल्या आर्थिक नुकसानी पोटी त्यांना काही अंशी का होईना आर्थिक भरपाई मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने या खरीप हंगामात शेतकर्‍यांच्या पिकांना विमा संरक्षण मिळावे म्हणून अवघ्या 1 रुपयात प्रति हेक्टरी सर्वसमावेशक प्रधानमंत्री पीक विमा योजना मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही सुरूच ठेवली असून शेतकर्‍यांनी जवळच्या शासकीय बँकेत, सीएससी केंद्रात, आपले सरकार केंद्रात अथवा ुुु.िाषलू.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर आपल्या खरीप हंगामातील पिकांचे आवश्यक ती कागदपत्रे विमा संरक्षण करून घ्यावे. तसेच याविषयी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय तसेच कोपरगाव तालुका विमा प्रतिनिधी वैभव वहाडणे 9175692760 व  अहमदनगर जिल्हा विमा प्रतिनिधी पंकज रोहोम 9921961552 यांच्या सोबत संपर्क साधावा. पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2024 असून तोपर्यंत जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी 1 रुपयात पिक विमा योजनेचा फॉर्म भरून लाभ घ्यावा.

प्रति हेक्टरी 1 रुपयात विमा संरक्षण मदत
बाजरी-33913 रुपये.
भुईमूग-38000 रुपये.
सोयाबीन-57261 रुपये.
तूर- 36802 रुपये.
कापूस-59983 रुपये.
मका-35598 रुपये.
कांदा- 80000 रुपये.
मनोज सोनवणे, कोपरगाव तालुका कृषी अधिकारी.

विमा भरण्याची मुदत वाढवावी – राज्यातील बहुतांश भागात अद्याप पाऊस पडला नसल्याने अनेक ठिकाणच्या पेरण्या बाकी असून शेतकरी डोळ्यात जीव आणून पावसाची वाट पाहत आहे. त्यामुळे 15 जुलै नंतर शेतकर्‍यांनी पेरलेल्या पिकांना विमा संरक्षण मिळू न शकल्याने ते शेतकरी या योजनेपासून वंचित राहू शकतात या बाबीचा विचार करत शासनाने पीक विमा भरण्याची मुदत किमान 30 जुलैपर्यंत करावी. अ‍ॅड. नितीन पोळ, लोकस्वराज्य आंदोलन

आवश्यक कागदपत्रे
7/12 उतारा
8 अ उतारा
पीक पेरणी दाखला
आधार कार्ड
बँक पासबुक

COMMENTS