नवी दिल्ली : राजधानी दिल्ली हिट अँड रनच्या घटनेने हादरली. एका भरधाव मर्सिडीज कारने सायकलवरून जाणार्या एका व्यक्तीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे
नवी दिल्ली : राजधानी दिल्ली हिट अँड रनच्या घटनेने हादरली. एका भरधाव मर्सिडीज कारने सायकलवरून जाणार्या एका व्यक्तीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेनंतर कार चालक पळून गेला होता. पोलिसांनी त्याला कारसह ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
राजेश (वय 34) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना दिल्लीतील आश्रम परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश हा शनिवारी सकाळी कामावर जात होता. यावेळी तो आश्रम परिसरातील भोगल उड्डाणपुलाजवळ आला असता एका भारधाव मर्सिडीजने त्याला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की तो या घटनेत गंभीर जखमी झाला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी तातडीने त्याला जवळील दवाखान्यात भरती केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी आरोपीचे नाव जाहीर केलेले नाही. पोलिसांनी वाहन चालकाला व वाहन ताब्यात घेतले आहे. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी भरधाव वेगात आलेल्या मर्सिडीजने आश्रमाजवळ सायकलस्वार राजेश नामक तरुणाला धडक दिली. या अपघातात राजेशचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी कारसह पळून गेले. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत कार ताब्यात घेतली आणि चालकाला देखील अटक केली आहे. पीडित राजेश कामावर जात असताना भोगल उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला. मागून भरधाव येणार्या मर्सिडीज कारने त्याला धडक दिल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. राजेश हा मूळचा उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील असून त्याला दोन मुले आहेत. तो दक्षिण पूर्व दिल्लीतील जोरबाग भागात माळी म्हणून काम करत होता.
COMMENTS