Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू

छ. संभाजीनगर : मुंबई येथून अकोल्याला कुरिअरची वाहतूक करणार्‍या पिकअप आणि ट्रकचा दौलताबाद माळीवाडा येथील समृध्दी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अ

मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील अपघातात तिघांचा मृत्यू
ओव्हरटेक करण्याच्या नादात बाईकस्वार थेट कारला जाऊन आदळला.
मध्यप्रदेशात बस दरीत कोसळून 15 जणांचा मृत्यू

छ. संभाजीनगर : मुंबई येथून अकोल्याला कुरिअरची वाहतूक करणार्‍या पिकअप आणि ट्रकचा दौलताबाद माळीवाडा येथील समृध्दी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअप चालक गंभीर जखमी झाला असून क्लिनरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विजयकुमार रणजित डागी (वय 50, रा. झारखंड), असे मृत्यू झालेल्या क्लिनरचे नाव आहे. तर दिपू कुमार डांगी वय31 रा.झारखंड असे जखमी चालकाचे नाव आहे. कुरिअर वाहतूक करणारी पिकअप एमएच 27 बीएक्स 7641 ही मुंबई येथून अकोल्याच्या दिशेने कुरिअरची वाहतूक करण्यासाठी निघाले असतांना हा अपघात झाला.

COMMENTS