Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू

धामणगाव ः  रायपूर येथून शिर्डीला दर्शनाला जात असताना गाडीचा वेग नियंत्रणात न आल्याने धामणगावनजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात रायपूर येथी

राजकीयदृष्ट्या वेगळे; पण नाते कायमः ठाकरे
तीन दहशतवाद्यांना पुलवामात कंठस्नान
श्री स्वामीचे अनुभव | Shri Swami Samarth Maharajanche Anubhav

धामणगाव ः  रायपूर येथून शिर्डीला दर्शनाला जात असताना गाडीचा वेग नियंत्रणात न आल्याने धामणगावनजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात रायपूर येथील कापड व्यापारी जागीच ठार झाले, तर तिघे जण किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवारी पहाटे चार वाजता घडली. दिनेश दौलत पंजवाणी वय 37 वर्ष (रा . खिलोना फॅक्टरी, साईनगर, जेल रोड, रायपूर) असे मृताचे नाव आहे. वाहन तेच चालवित होते. मनीष पंजवाणी (33),  प्रदीप जगन्नाथ चांदवानी (45), विकास जानवाणी (23. सर्व रा. रायपूर) असे जखमीचे नावे आहेत.

COMMENTS