बागेश्‍वर धाममध्ये शेड कोसळून एकाचा मृत्यू

Homeताज्या बातम्या

बागेश्‍वर धाममध्ये शेड कोसळून एकाचा मृत्यू

भोपाळ / येथील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्‍वर धाममध्ये टिन शेड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत एका भाविकाचा मृत्यू झाला आणि 8 जण जखमी झाले.

जम्मू-काश्मीरमध्ये पाककडून घुसखोरीचा प्रयत्न
नगरच्या एमआयडीसी परिसरातही हनी ट्रॅप…
वृक्षतोड रोखण्यासाठी चार पथके तैनात


भोपाळ /

येथील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्‍वर धाममध्ये टिन शेड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत एका भाविकाचा मृत्यू झाला आणि 8 जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि.3) सकाळी 7:30 च्या सुमारास दरबारजवळ भाविक उभे असताना घडली. हे सर्व भक्त बाबा बागेश्‍वर यांना भेटण्यासाठी आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशाच्या बस्ती जिल्ह्यातील रहिवासी असलेले राजेश यांचे सासरे श्यामलाल कौशल (50) यांचा यामध्ये मृत्यू झाला. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे बाबा बागेश्‍वर यांचे काही भक्त हे टिन शेडखाली उभे होते.

याच दरम्यान शेड कोसळल्याने चेंगराचेंगरी झाली आणि अनेक लोक खाली पडले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले. श्यामलाल कौशल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसेच सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी म्हणजेच 4 जुलै रोजी धीरेंद्र शास्त्री यांचा वाढदिवस आहे. यामुळे त्यांचे कुटुंब उत्तर प्रदेशहून बागेश्‍वर धामला आलं होतं. गुरुवारी सकाळी सर्वजण तयारी करून शास्त्रींना भेटण्यासाठी पोहोचले. याच दरम्यान ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

तसेच मदत आणि बचावकार्य सुरू केले. स्थानिक अधिकार्‍यांनी इमारत कोसळण्याच्या कारणाची चौकशी सुरू केली आहे आणि अधिकारी घटनास्थळी सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या का याचा आढावा घेत आहेत.

COMMENTS