Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी एकाची आत्महत्या

हिंगोली ः मराठा आरक्षणासाठी कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तुकाराम येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

चिठ्ठी लिहून महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये तरुणीची आत्महत्या.
महागडा मोबाईल न घेतल्याने तरुणाची आत्महत्या
अभियांत्रिकीच्या विद्यार्थिंनीची आत्महत्या

हिंगोली ः मराठा आरक्षणासाठी कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तुकाराम येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. 29) दुपारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजू शेषराव काळे (42) असे तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येहळेगाव तुकाराम येथील तरुण राजू हे मराठा आरक्षण चळवळीमध्ये सक्रिय होते. आखाडा बाळापूर, कळमनुरी या ठिकाणी झालेल्या आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला होता. या शिवाय हिंगोली जिल्हयात ठिकठिकाणी आरक्षणासाठी झालेल्या सभेमध्येही ते स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने ते अस्वस्थ होते. मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे शिक्षण घेऊनही नोकरी लागत नाही यामुळे ते तणावातच होते. त्यातच त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

COMMENTS