Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजी महाराज याच्या जयंती निमित्त अनाम प्रेम संस्थेस छावा संघटनेच्या वतीने सामाजिक उपक्रम

 अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने अनाम प्रेम संस्थेत छत्रपती संभाजी महाराज यांच्

टाकळीच्या अवलियाचा वैष्णोदेवीला मोटरसायकलवर प्रवास
आढळराव सोसायटीच्या चेअरमनपदी गणेश शिंदे
*दैनिक लोकमंथन ; कोरोनानंतरच्या लसीकरणावर केंद्राच्या निर्णयाला तज्ज्ञांचा आक्षेप

 अहमदनगर (प्रतिनिधी)– छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने अनाम प्रेम संस्थेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ब्लॅंकेट व विद्यार्थ्यांसाठी टोप्याचे वाटप करण्यात आले तसेच गो शाळेस आर्थिक मदत देण्यात आली यावेळी आरटीओचे इन्स्पेक्टर सुरज उबाळे, शिवप्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख बापू ठाणगे, अहमदनगर शहर जागरूक नागरिक मंचचे सुहासभाई मुळे, छावा संघटनेचे महिला जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई सांगळे, नगरसेविका सोनालीताई चितळे, साहेबराव पाचरणे, छावाचे रावसाहेब काळे, शिवाजी वेताळ, छावा संघटनेचे सचिव दत्ताभाऊ वामन आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आरटीओचे इन्स्पेक्टर सुरज उबाळे म्हणाले की वायफट खर्च न करता हा एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम घेतला असून छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक संघर्षांना मात दिली असून नवीन पिढींना इतिहास जपण्यासाठी काळाची गरज आहे व धर्म जपतच माणुसकी देखील जपण्याची भावना व्यक्त करत छावा संघटनेच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापू ठाणगे म्हणाले की युवा पिढीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इतिहासाला पुस्तकात न ठेवता आपल्या आचरणात आणण्याची गरज असून छत्रपती संभाजी महाराज यांनी 134 युद्धात शत्रूंना पराभूत केलेले असून त्यांचे आचरण अंगीकृत घेण्याची भावना व्यक्त केली तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दत्ताभाऊ वामन यांनी मांनले

COMMENTS