बुलढाणा प्रतिनिधी - मकरसंक्रांतीनिमित्त पंतग उडविण्याला विशेष महत्त्व असल्याने त्याची जय्यत तयारी युवकांतून केली जात आहे. या दिवशी अघोषित पतं

बुलढाणा प्रतिनिधी – मकरसंक्रांतीनिमित्त पंतग उडविण्याला विशेष महत्त्व असल्याने त्याची जय्यत तयारी युवकांतून केली जात आहे. या दिवशी अघोषित पतंग काटाकाटीच्या स्पर्धा शहरात होतात. यासाठी पतंग विक्रीच्या दुकानांवर युवकांची गर्दी होत असून विविध तिरंगा, कार्टून, मोदी, हिरो नावाने ओळखल्या जाणारे पतंग खामगावच्या बाजारात विक्रीस आले आहेत पतंग उडविण्यासाठी मोकळे मैदान व गच्चीचा उपयोग ग्रुप गुपने केला जातो. पतंग उडविण्याचा आंनद घेण्यात बच्चे कपंनीसह युवकदेखील सामील होतात. त्यामुळेच मोठ्यांसह बच्चे कंपनी सुद्धा पतंग घेण्यासाठी बाजारात आले आहेत.मकर संक्रांत दिवशी पतंगाच्या अघोषित काटाकाटीच्या स्पर्धा सुरू असतात. दिवसभर लगी, कटी असे बच्चे कपंनीचे आवाज घोळक्या घोळक्यात ऐकावयास येतात. पतंग कटल्यानंतर तो पकडण्यासाठी व मांजा घेण्यासाठी पळापळी करणाऱ्या युवकांतदेखील स्पर्धा लागते. मांजा ओढताना अनेकांचे हात व बोटे मांजामुळे ओरबाडले जातात, तसेच हाता – पांयानादेखील जखमा होतात. मात्र, पतंग उडविण्याच्या आनंदात या जखमाचे युवकांना भानदेखील राहत नाही.बाजारात पतंग 2 रु पासुन 50 रु पर्यंत व वापरण्यात येणारा मांजा 100 पासुन तर 500 पर्यंत विक्री होत आहे. खामगावात सध्या बाजारात सर्व प्रकारचे पतंग विक्रीस आलेले आहेत.
COMMENTS