डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करित असताना विचारांची बांधिलकी जोपासत वर्तमान वस्तुस्थिती मांडावं असं वा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करित असताना विचारांची बांधिलकी जोपासत वर्तमान वस्तुस्थिती मांडावं असं वाटतं. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर (दादर) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. त्यावेळी हिंदू स्मशान भूमी एवढीच त्या जागेची ओळख होती. काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला. आंबेडकरांना श्रद्धांजली व आदरांजली अर्पण करण्याकरिता भारताच्या सर्व प्रांतातून लाखोंच्या संख्येचा मोठा बौद्ध जनसमूदाय मुंबई येथील चैत्यभूमी (दादर) शिवाजी पार्क येथे दरवर्षी १ डिसेंबर पासून येत असतो. दरवर्षी येणाऱ्या श्रद्धावान अनुयायांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढतच असते. २५ लाख अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात. डॉ. आंबेडकरांचे अनुयायी-विचारवंत तसेच देश-विदेशातील जनतेकरिता हे चैत्यभूमी स्मारक प्रेरणास्थान आहे. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक ‘बोधिसत्त्व’ मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरू होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे २५ लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या डॉ.आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे, स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात. राजकीय नेते व इतर मंडळी बाबासाहेबांच्या सार्वजनिक ठिकाणच्या आंबेडकर स्मृतीस्थळांना वंदन करतात. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे . शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश समाजाला सत्वाची जाणीव व्हावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले . “ शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे , ते जो पिला तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही .” असे ते समाज बांधवाना सांगत . प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे , म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे ते सांगत . प्रथमिन शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे कि मुलगी किंवा मुलगा एकदा शाळेत दाखल झाले कि ते परिपूर्ण सुशिक्षित , माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावेत . शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे . डॉ. बाबासाहेबांचे म्हणने होते कि , समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे . शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौधीकदृष्ट्या सशक्त होतो . व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो . प्रज्ञा , शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे . शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये , तर मुलांची मने सुसंकृत व गुणवत्तामय बनवावी . समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत, असे शिक्षण असावे . शला म्हणजे उत्तम नागरिक बनविणारे आहेत याचे भान या प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांनी ध्यानी घ्यावे . १९४६ साली पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरु केले . राष्ट्रहिताचे व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय , असे ते मानीत. समाजासाठी सर्वस्वी अर्पण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन.

COMMENTS