Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त देवगडमध्ये उसळली भाविकांची गर्दी

गुरूबद्दल असलेल्या भक्तीभावाला शेवटच्या श्‍वासापर्यंत जपा ः श्री भास्करगिरीजी बाबा

नेवासाफाटा: गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य हभप श्री

पारनेर तहसीलदार ज्योती देवरेंच्या ऑडिओ क्लीपने राज्यात भूकंप; आत्महत्या इशार्‍याने खळबळ, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
अशोक कारखान्यावर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे ३५ वर्षीची सत्ता कायम
लोकसाहित्य संशोधक डॉ. प्रभाकर मांडे यांचे कार्य दीपस्तंभा प्रमाणे : डॉ.अनिल सहस्रबुद्धे

नेवासाफाटा: गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य हभप श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या आयोजित कीर्तन सोहळयाला उच्चांकी गर्दी दिसून आली. सुमारे दोन लाख भाविकांनी भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले. गुरूंचा महिमा व लीला अगाध असून संत हे जगाचे कृपाळू मायबाप आहे, गुरूंबद्दल असलेल्या भक्तीभावाला शेवटच्या श्‍वासापर्यंत जपा असे आवाहन गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांनी यावेळी झालेल्या कीर्तन सोहळयात बोलतांना केले.
       गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पहाटेच्या सुमारास भगवान दत्तात्रय,श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या समाधीस अभिषेक घालण्यात आला. देवगड येथील ज्ञानसागर सभामंडपामध्ये गुरुवर्य परमपूज्यनीय श्री भास्करगिरीजी बाबा यांचे गुरू शिष्य परंपरा व गुरू महिमा यावर हरिकीर्तन झाले. श्री समर्थ सदगुरू किसनगिरीजी बाबांनी गुरुदेव दत्त पिठाची निर्मिती करतांना अनवाणी पायाने फिरले,त्यांनी यासाठी फार कष्ट सोसले त्यांनी देवगड येथे गुरुदेव दत्त पीठ हे आपल्या सुखासाठी व मानव जातीच्या उद्धारासाठी  निर्माण केले आहे,त्यांनी दिलेल्या विचार प्रणालीचे पालन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असून  गुरूंबद्दल असलेला भक्ती भाव व श्रद्धेला शेवटच्या श्‍वासापर्यंत जपा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
                   यावेळी झालेल्या कीर्तन सोहळयाच्या प्रसंगी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या भाविकांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांसह उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे संतपूजन केले.यावेळी झालेल्या किर्तनानंतर महाआरती करण्यात आली.महाआरतीच्या प्रसंगी देवगडचे दत्त मंदिर प्रांगण हजारो भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.मंदिर प्रांगणात विविध दुकाने मोठ्या प्रमाणात थाटल्याने यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी झालेल्या कीर्तन प्रसंगी संतसेवक हभप दिनकरजी महाराज मते, गुरुवर्य बाबांच्या मातोश्री सरुआई पाटील,स्वामींच्या मातोश्री मिराबाई मते, युवा नेते उदयनदादा गडाख, नारायण महाराज ससे, गणपत महाराज आहेर, गायनाचार्य पंढरीनाथ महाराज मिस्तरी, बाबासाहेब महाराज सातपूते, संतसेवक बाळू महाराज कानडे, तात्या महाराज शिंदे, नामदेव महाराज कंधारकर, मृदुंगाचार्य गिरीजीनाथ महाराज जाधव, अमोल महाराज बोडखे, रामनाथ महाराज पवार, संजय महाराज निथळे, कल्याण महाराज पवार, शुभम महाराज बनकर, सेवेकरी बबनराव वरघुडे, दिनकरराव कदम, ज्ञानदेव लोखंडे, छत्रपती संभाजीनगर येथील भक्त मंडळाचे सेवेकरी गायक रामजी विधाते, बजरंग विधाते, मुरमे गावचे सरपंच अजय साबळे, नगर भक्त मंडळाचे सेवेकरी यांच्यासह भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित भाविकांना गंगापूर येथील साबणे परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने आलेल्या हजारो भाविकांनी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांचे दर्शन घेतले यावेळी गुरुवर्य बाबा व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी हसतमुखाने भाविकांशी सुसंवाद साधला.देवगडचे मुख्य प्रवेशद्वार,श्री सिद्धेश्‍वर मंदिर, श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा समाधी मंदिर याठिकाणी भाविकांची झालेली गर्दी लक्षणीय होती.

COMMENTS