छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त लेझीम स्पर्धेचं आयोजन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त लेझीम स्पर्धेचं आयोजन

स्पर्धेत 200 शाळांचा सहभाग

बीड प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती मध्ये लेझीम पथकाची परंपरा अबाधित राहावी. याकरिता स्वाभिमान संघटनेने पुढाकार घेतला. बीड शहरात शि

अखेर नीलकमल बोटीचा प्रवासी परवाना रद्द
30 मीटर जागा असेल तरच राष्ट्रीय मार्गाला मंजुरी मिळते मग आता कुठे घोडे अडले-आ.प्रदीप नाईक
आयटीआयमधील प्रशिक्षणार्थींच्या विद्यावेतनात वाढ

बीड प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती मध्ये लेझीम पथकाची परंपरा अबाधित राहावी. याकरिता स्वाभिमान संघटनेने पुढाकार घेतला. बीड शहरात शिवजन्मोत्सवानिमित्त सिद्धिविनायक संकुलात लेझीम स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जिल्ह्यातील 200 शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शिवकालीन काळापासून लेझीमची परंपरा आहे. हिच परंपरा जतन करण्यासाठी आणि शिवजन्मोत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी या लेझीम स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत बीडच्या श्री शिवाजी विद्यालयाने मानाची ढाल आणि रोख 11 हजार 111 रुपयांचं प्रथम पारितोषिक पटकाविले आहे. तर गेवराई तालुक्यातील रुई विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांनी 7 हजार 777 रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळविले आहे

COMMENTS