Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिर्डी येथे भव्य छायाचित्र प्रदर्शनास सुरूवात

शिर्डी : शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट देवालयाच्या १६ गुंठे प्रांगणात, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (आझादी का अमृत महोत्सव)

अरणगाव ग्रामपंचायतीला सदस्य ठोकणार टाळे
श्रीकृष्णचरित्र म्हणजे सर्वधर्माचे सारतत्व ः हभप सखाराम महाराज
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचा उद्या बॉयलर अग्नि प्रदीपन

शिर्डी : शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट देवालयाच्या १६ गुंठे प्रांगणात, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (आझादी का अमृत महोत्सव) २६ ते २८ जुलै २०२२ रोजी छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत (IAS) यांच्या हस्ते कारगील विजय दिन २६ जुलै रोजी करण्यात आले. या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ठळक घटनांना उजाळा मिळाला आहे. चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी आबालवृध्द भाविक व नागरिकांची गर्दी होत आहे. या प्रदर्शनाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील केंद्रीय संचार ब्यूरो व श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. याप्रसंगी पुणे केंद्रीय संचार ब्युरोचे उपसंचालक निखिल देशमुख, मुंबई प्रकाशन विभाग सहायक संचालक उमेश उजगरे, शिर्डी नगरपरिषद मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, अहमदनगर केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी पी कुमार , क्षेत्रीय प्रचार सहायक देवेंद्र हिरनाईक, माहिती अधिकारी सुरेश पाटील आणि सुर्यतेजचे संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके तसेच साईबाबा संस्थान ट्रस्टच्या सर्व विभाग प्रमुखांसह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या प्रदर्शनास श्री.साईबाबा संस्थान ट्रस्टचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी भेटी दिल्या. प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्त्वाच्या घटना-घडामोडी, चित्र स्वरूपात प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. यात १८५७ ते १९४७ भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्यसेनानी यांची जीवनगाथा चित्र आणि माहिती स्वरुपात मांडण्यात आली आहे.

       

प्रदर्शनाच्या ठिकाणी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या, प्रकाशन विभागातर्फे पुस्तक प्रदर्शन विक्री स्टॉल ठेवण्यात येणार आहे. या पुस्तक प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील यशोगाथा, कला, संस्कृती, वारसा, विज्ञान व क्रीडा आदि विविध विषयांची मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पुस्तके सवलतीच्या दरात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. या प्रदर्शनाच्या ठिकाणी शाहीर हमीद सय्यद व कलाकारांचे देशभक्तीपर गीते व पोवाड्याचा सांस्कृतिक कार्यक्रम ही ठेवण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वाक्षरी अभियान ही राबविण्यात येत आहे. ‘तिरंगा सेल्फी बुथ’ हा प्रदर्शनास भेट देणाऱ्या साईभक्त व नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. छायाचित्र प्रदर्शन सकाळी ९ ते रात्री ९ वाजेदरम्यान आबालवृध्दांसाठी विनामुल्य खूले राहणार आहे. याचा भाविक व नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केले आहे.

COMMENTS