अहमदनगर ः नगरचा बहुचर्चित असलेला उड्डाणपूल हा अपघाताच्या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला आला आहे. उड्डाण पुलाच्या उद्घाटनानंतर या पूलावरती
अहमदनगर ः नगरचा बहुचर्चित असलेला उड्डाणपूल हा अपघाताच्या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला आला आहे. उड्डाण पुलाच्या उद्घाटनानंतर या पूलावरती अनेक छोटे-मोठे अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. गेल्या पंधरा दिवसापूर्वी देखील या उड्डाणपुलावरुन टेम्पो वरून खाली पडल्याने एक व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच चांदनी चौकाच्या वळणावर पुन्हा एकदा ब्लॉक घेऊन जाणारा एक ट्रक पलटी झाल्यानंतर त्यातील ब्लॉक पुलावरून खाली पडले, परंतु रात्रीची वेळ असल्याकारणाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग कार्यालय येथे जाऊन वारंवार होणार्या अपघाताची मालिका थांबावी, यासाठी उड्डाणपुलावरील काही बदल करण्यासंदर्भात शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी सूचना केल्या होत्या.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने केलेल्या सुचनाची दखल घेऊन या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे अधिकार्यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्यांसमवेत उड्डाण पुलावर येऊन पाहणी केली व ज्या आवश्यक सूचना केल्या त्या पूर्ण करण्याचं आश्वासन देखील दिले राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांनी दिले. यावेळी शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, संदीप दातरंगे, मुन्ना भिंगारदिवे, प्रशांत भाले, महेश शेळके आदी उपस्थित होते. यावेळी शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले कि, उड्डाणपुल सुरु झाल्यापासून या पुलावर अपघाताची मालीका थांबता थांबेना, या पुलावर झेब्रा क्रॉसिंग नाही, स्पिड किती राखावा, याबाबतचे फलक नाही, कॅमेरे नाही, अपघातामुळे काही संरक्षण जाळ्या तुटल्या होत्या, त्यांची उंची वाढविण्यात यावी, नगरकरांच्या दृष्टींने अत्यंत महत्वाचा पुल आहे. या सर्व गोष्टींबाबत राष्ट्रीय महामार्ग कार्यालयातील अधिकार्यांना प्रत्यक्ष दाखवुन त्यांची पाहणी केली. तसेच सध्या पाऊस असल्याने काम करण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. येत्या आठ दिवसांमध्ये जर हि कामे झाली नाही, तर शिवसेनेच्या वतीने उग्र स्वरुपाचे आंदोलन हाती घेण्यात येईल, अशा ईशारा कदम यांनी दिला. माजी महापौर भगवान फुलसौंदर म्हणाले की, शिवसेना पक्ष नेहमी जनतेच्या प्रश्नांसाठी तत्पर असते. त्यामुळे नगरशहरात कोणताही प्रश्न निर्माण झाला की, शिवसेना त्वरीत प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेते. उड्डाणपुला वरील अपघाताची मालीका हि थांबली पाहिजे. नागरीकांना सुरक्षित प्रवास झाला पाहिजे. त्यासाठीच राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने लवकरात लवकर हे काम मार्गी लावावे.
COMMENTS