Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट

परभणीतील युवकास केले अटक

बीड ः लोकसभा निवडणुकीतील अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत बीडमध्ये पंकजा मुंडेंचा अतिशय कमी फरकाने पराभव झाला होता. त्यामुळे, साहजिकच पंकजा यांचा

मुंडे भगिनींना डावलण्या मागे नेमका कुणाचा हात ? lपहा LokNews24
जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, पंकजांचा धनंजय मुंडेंवर हल्ला (Video)
 मुंडे बहिण भावात पुन्हा एकदा कलगीतुरा पाहायला मिळाला

बीड ः लोकसभा निवडणुकीतील अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत बीडमध्ये पंकजा मुंडेंचा अतिशय कमी फरकाने पराभव झाला होता. त्यामुळे, साहजिकच पंकजा यांचा पराभव त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. कारण, यंदा प्रथमच बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत जातीय रंग पाहायला मिळाला. जातीय तेढ निर्माण झाल्यानेच पंकजा मुंडेंचा पराभव झाल्याचे बोललं जात आहे. त्यातच, पराभवानंतर मुंडेंच्या समर्थकांनी मोठी निराशा व्यक्त केली. जिल्ह्यात काही ठिकाणी आत्महत्येच्याही घटना घडल्या आहेत. मात्र, दरम्यानच्या काळात पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. काही, तालुक्यात बंदही पुकारण्यात आला. आता, परभणी पोलिसांनी पंकजा मुंडेंविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍या युवकाला अटक केली आहे.  
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍या युवकावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध परळीत गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपास सुरू केला असता सदरील युवकाला परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले. आता, संबंधित युवकाला परळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सदरील आरोपीने इन्स्टाग्रामवर पंकजा मुंडे यांच्याविषयी अत्यंत अश्‍लील शब्दांत एक प्रतिक्रिया टाकली होती. आपल्या पोस्टमुळे भावना दुखावल्या जाणे तसेच दोन जातीमध्ये किंवा दोन गटात द्वेषाची भावना निर्माण होईल, याची कल्पना असताना देखील जाणीवपूर्वक इंस्ट्राग्रामवर ही पोस्ट टाकण्यात आली. त्यामुळे, याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS