Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाच स्वीकारणार्‍या सहाय्यक पोलीस निरीक्षका विरुद्ध गुन्हा

नाशिक प्रतिनिधी - अटकपूर्व जामीन मंजूर करण्याच्या कामी मोबदल्यापोटी 30 हजार रुपयांची लाच मागणार्‍या अहमदनगरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरुद्ध गु

 दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया यांच्या समर्थनार्थ बीड मध्ये आप समर्थकांची निदर्शने
न्यायाधीशांच्या नियुक्त्यामध्ये सरकारची भूमिका हवी
अमिताभ बच्चन यांना कायमची दारू सोडायला लावणाऱ्या जिवलग मित्राची खास कहाणी

नाशिक प्रतिनिधी – अटकपूर्व जामीन मंजूर करण्याच्या कामी मोबदल्यापोटी 30 हजार रुपयांची लाच मागणार्‍या अहमदनगरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की संशयित विवेक अशोक पवार (वय 35) हे अहमदनगर येथे कोतवाली पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहतात. यातील तक्रारदार यांचा मावसभाऊ व त्याच्याबरोबर असलेले चार सहआरोपी यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक न करता अटकपूर्व जामीन मंजूर होण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती 25 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एकनाथ बाविस्कर, प्रकाश महाजन व नितीन नेटारे यांच्या पथकाने सापळा रचून संशयित सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार यांच्याविरुद्ध कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षिका शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली

COMMENTS