छ.संभाजीनगर : राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असतांना, मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यास ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध केला असून, याविरो

छ.संभाजीनगर : राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असतांना, मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यास ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध केला असून, याविरोधात ओबीसी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत आज बुधवारपासून आंंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकारसमोरील अडचणीत वाढ होणार आहे.
मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास त्यांनी विरोध दर्शवला असून ओबीसी समन्वय समितीने या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 सप्टेंबर सकाळी 10 पासून अन्नत्याग आंदोलना इशारा संघटनेने दिला आहे. येथील क्रांतीचौकात हे आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भातील बैठक नुकतीच औरंगपुर्यातील संत सावता महाराज मंदिरात पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार ओबीसी समन्वय समितीच्या वतीने माजी आमदार नारायणराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीमधील समन्वय समितीच्या पदाधिकार्यांची बैठक झाली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत ओबीसींच्या विविध मागण्या आणि ओबीसींवर होणार्या अन्यायासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध करण्यात आला. तसेच या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला असून याची रूपरेषा देखील ठरवण्यात आले आहे. समन्वय समितीतर्फे 13 तारखेपासून हे आंदोलन करण्यात येणार आहे. 10 वाजता क्रांती चौकात धरणे आंदोलन, निदर्शने केली जाणार असून यानंतर अन्नत्याग आंदोलनाला आंदोलक बसणार आहे. ओबीसी समन्वय समितीने सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी संबोधून ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये. सर्व जातीची जातनिहाय जन- गणना त्वरित करावी, आजतागायत मराठा समाजाला कुणबी (ओबीसी) म्हणून दिलेली जातींची प्रमाणपत्रे रद्द करून संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी, ओबीसी, (व्हिजेएनटी, एसबीसी) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत महागाई निर्देशांकानुसार वाढ करण्यात यावी, ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. ती त्वरित चालू करावी या सारख्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात आता ओबीसी मराठा संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे.
COMMENTS