आता 17 व्या वर्षीच मतदार ओळखपत्र मिळणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आता 17 व्या वर्षीच मतदार ओळखपत्र मिळणार

नवी दिल्ली : देशातील तरुणांना वयाो 17 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, आता मतदान कार्डसाठी अर्ज करता येणार आहे. त्यासाठी तरुणाचे वय 18 वर्षे असणे आवश्यक नाही.

“मुख्यमंत्र्यांनी पाणी दिलं नाही पण ईश्वराने दिलं”, फडणवीसांचा जल आक्रोश मोर्चा | LokNews24
द्वारकामाई साई मंदिरात महाआरती व महाप्रसाद
अर्थमंदीची चाहूल !

नवी दिल्ली : देशातील तरुणांना वयाो 17 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, आता मतदान कार्डसाठी अर्ज करता येणार आहे. त्यासाठी तरुणाचे वय 18 वर्षे असणे आवश्यक नाही. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी यांना यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या नवीन निर्देशांनंतर, 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारे तरुण मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे यांनी सर्व राज्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. आता तरुणांना मतदान कार्डसाठी वर्षातून तीनदा आगाऊ अर्ज करता येणार आहे.निवडणूक आयोगाच्या नवीन सूचनेनुसार, तरुणांना 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबरलाही मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी निवडणूक आयोग नवीन नोंदणी फॉर्म आणणार आहे. याकरिता तुम्हाला आधार कार्डची माहिती द्यावी लागणार आहे. मात्र, आधार कार्डची सक्ती असणार नाहीय. तुम्ही अर्जदार म्हणून स्वेच्छेनेही माहिती देऊ शकता.
तेलंगणा राज्यातही मतदार यादीत सुधारणा करण्यात येत आहे. 18 वर्षांचे असलेले लोकही नव्या यादीत समाविष्ट होणार आहेत. या वर्षी मतदार यादी दुरुस्तीमध्ये 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै किंवा 1 ऑक्टोबर रोजी 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या तरुण मतदारांचाही समावेश असेल. यापूर्वी 1 जानेवारीला 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांचा मतदार यादीत समावेश करण्याची कट ऑफ डेट ठेवण्यात आली होती. तेलंगणाचे मुख्य निवडणूक अधिकारी विकास राज यांनी सर्व जिल्ह्यांच्या डीएमशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रातील सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींची बैठक बोलावून मतदान यादी सुधारण्याबद्दल माहिती देण्यास सांगितलंय. या दुरुस्तीदरम्यान झालेल्या काही चुकाही सुधारल्या जातील. या दुरुस्तीची प्रक्रिया 4 ऑगस्ट ते 24 ऑक्टोबर दरम्यान पूर्ण होईल. परंतु, अंतिम यादी 8 डिसेंबर रोजी येणार असून, त्यात सर्व हरकती दूर केल्या जातील. मतदार यादीतील दुरुस्तीबाबत लोकांना माहिती व्हावी, यासाठी रविवार आणि शनिवार या दोन दिवशी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे. सर्व हरकती आणि दाव्यांचा समावेश केल्यानंतर 5 जानेवारी 2023 रोजी अंतिम यादी तयार होईल.

COMMENTS