Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई, ठाण्यात आता व्हर्टिकल विद्यापीठ

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे महापालिका क्षेत्रात आता खासगी संस्था, कंपन्यांना स्वंयअर्थसाहाय्यित तत्त्वावर ‘व्हर्टिकल विद्यापीठ संकुल’ स्थ

मुंबईकरांना एप्रिलपासून मिळणार मोफत वैद्यकीय उपचार
अखेर दत्ता दळवींना जामीन मंजूर
‘भाईयो और बहनो…’ म्हणत राहुल गांधींनी केली पंतप्रधान मोदींची नक्कल

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे महापालिका क्षेत्रात आता खासगी संस्था, कंपन्यांना स्वंयअर्थसाहाय्यित तत्त्वावर ‘व्हर्टिकल विद्यापीठ संकुल’ स्थापन करता येणार आहे. यासाठी किमान 15 हजार चौरसमीटर बांधकाम असणारी, स्वतंत्र असलेली इमारत आवश्यक आहे. कोणत्याही संस्था आणि कंपन्यांना हे विद्यापीठ स्थापन करता येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबतचे निकष बुधवारी जारी केले माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांच्या अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने मुंबई शहर जिल्ह्यात स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध नसेल तर, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन व तेलअविव या शहरांमध्ये उभारण्यात आलेल्या व्हर्टिकल विद्यापीठ संकुलाप्रमाणे आणि त्याच धर्तीवर मुंबई शहर जिल्ह्यामध्ये असे विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर विभागाने निकष जारी केले आहेत. व्हर्टिकल विद्यापीठासाठीचे निकषांमध्ये किमान 15 हजार चौरस मीटर बांधकाम असणारी स्वतंत्र इमारत असावी, उपलब्ध जमीन व बांधकाम यांचे प्रमाण महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे तरतुदींनुसार हवे, सदर इमारतीमध्ये कोणताही व्यवसायिक भागधारक नसावा. विद्यार्थी संख्या वाढल्यास वाढीव बांधकामासाठी वाव असावा. वर्गखोल्या इतर सोयी-सुविधा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे असाव्यात. नॅकची 3.25 ग्रेड पॉइंट किंवा समकक्ष एनबीए किंवा एनआयआरएफ यामध्ये पहिल्या 200 मध्ये आलेले प्रायोजक मंडळ अर्ज करण्यास पात्र असतील. जवळच्या परिसरात विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वसतिगृहाची सोय असावी. किमान 40 टक्के क्षेत्र खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवणे बंधनकारक राहील, असे निकष यात देण्यात आले आहेत.

COMMENTS