Homeताज्या बातम्यादेश

आता 25 जून ‘संविधान हत्या’दिवस !

केंद्र सरकारचा निर्णय ; अधिसूचना जारी

नवी दिल्ली ः संविधानाचे खरे पालक कोण यावरून सध्या इंडिया आघाडीविरोधात एनडीएचा सामना रंगतांना दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत संविधान बचावचा नारा

वाझेंकडील पाच बॅगात काय दडले? ; बनावट आधारकार्डाच्या आधारे ट्रायडंटमध्ये मुक्काम
समृद्धीवरील अपघातात तिघांचा मृत्यू
अविनाश भोसलेच्या चार कोटींच्या संपत्तीवर ईडीकडून टाच

नवी दिल्ली ः संविधानाचे खरे पालक कोण यावरून सध्या इंडिया आघाडीविरोधात एनडीएचा सामना रंगतांना दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत संविधान बचावचा नारा इंडिया आघाडीने दिल्यामुळे एनडीएला मोठा फटका बसला होता. त्यानंतरही लोकसभेत खासदारकीची शपथ घेतांना काँगे्रसच्या नेत्यांनी संविधान सोबत नेले होते. मात्र आम्ही संविधानाशी प्रामाणिक असल्याचा दावा एनडीएकडून करण्यात येत होता. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी आणीबाणी जाहीर केली होती. तो 25 जूनचा दिवस केंद्र सरकारने संविधान हत्या दिवस म्हणून शुक्रवारी घोषित केला. तशी अधिसूचनाच केंद्र सरकारने काढली आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करतांना म्हटले आहे की, 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकूमशाही मानसिकता दाखवत देशात आणीबाणी लादत भारतीय लोकशाहीचा गळा घोटला होता. लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकले आणि माध्यमांचा आवाज दाबला होता. भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस ’संविधान हत्या दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस 1975 च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणार्‍या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करेल. गृहमंत्री शहा यांनी पुढे म्हटले आहे की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा उद्देश हुकूमशाही सरकारच्या असंख्य यातना आणि दडपशाहीचा सामना करूनही लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी लढलेल्या लाखो लोकांच्या लढ्याचा सन्मान करणे हा आहे. ’कॉन्स्टिट्यूशन किलिंग डे’ लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आणि प्रत्येक भारतीयामध्ये व्यक्तिस्वातंत्र्याची अमर ज्योत तेवत ठेवण्यासाठी कार्य करेल, जेणेकरून भविष्यात काँग्रेससारखी हुकूमशाही मानसिकता त्याची पुनरावृत्ती करू शकणार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. इतिहासात 25 जून हा दिवस भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटनेचा साक्षीदार आहे. 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यामार्फत देशात आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती, ज्याने अनेक ऐतिहासिक घटनांना जन्म दिला. इंदिरा गांधी यांनी सरकार आणि सत्तेविरोधात आवाज उठवणार्‍या हजारो लोकांना जेलमध्ये टाकले होतं. 26 जून 1975 पासून 21 जून 1977 या 21 महिन्यांच्या कालावधीत भारतात आणीबाणी होती. आणीबाणीच्या काळात लोकसभा निवडणूकही स्थगित केली होती. इंदिरा सरकारविरुद्ध संघर्षाचं बिगुल वाजवणारे लोकनायक जयप्रकाश नारायण आणि मोरारजी देसाई यांसारखे नेते, तसंच सरकारची टीका करणारे पत्रकार, समाजसेवक, विविध संघटनांचे लोक आणि विद्यार्थी यांची रवानगी तुरुंगात केली होती.

काँगे्रसला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने भाजप विरोधात प्रचार करताना संविधान बदलण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. यामुळे इंडिया आघाडी आणि काँग्रेसला गेल्या दोन लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक यश मिळाले. तर, भाजपचे संख्याबळ घटले. लोकसभेत राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले. राहुल गांधी यांनी सदस्यत्वाची शपथ घेताना संविधानाची प्रत हाती घेऊन शपथ घेतली होती. मात्र, काँगे्रसला शह देण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचे बोलले जात आहे.

COMMENTS