Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आता जिल्ह्यात उत्सुकता…कौन बनेगा उपसरपंच

पुढच्या आठवड्यात होणार निवडणूक

अहमदनगर/प्रतिनिधी ः जनतेने केलेल्या मतदानातून जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींवर सरपंच निवडले गेले आहेत. काही ठिकाणी त्यांच्या विचारांचे सदस्य निवडू

डॉ. बाबुराव उपाध्ये यांची पुस्तके भक्ती व नीतीचे संस्कार देतात : मीराताई बागूल
महापालिकेच्या वतीने पाईपलाईन रोड येथील चौकाचे कै.शंकरभाऊ वाणी नामकरण
वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळून पर्जन्यचक्र खंडीत : अभय आव्हाड

अहमदनगर/प्रतिनिधी ः जनतेने केलेल्या मतदानातून जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींवर सरपंच निवडले गेले आहेत. काही ठिकाणी त्यांच्या विचारांचे सदस्य निवडून आलेत तर काही ठिकाणी त्यांच्या विरोधातील. त्यामुळे आता ग्रामपंचायतींच्या कामकाजात संघर्ष अपेक्षित मानला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर, आता जिल्हाभरात कौन बनेगा उपसरपंच…याची उत्सुकता आहे. निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांतून उपसरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे हा निवडून येणारा उपसरपंच विरोधकांचा असेल की जनतेने निवड़लेल्या सरपंचाच्या बाजूचा असेल, याचे कुतूहल वाढले आहे.

जिल्ह्यात मुदत संपलेल्या 203 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम नुकताच पार पडला. यात 15 सरपंच आधीच बिनविरोध निवडून आलेले होते. तर राहिलेल्या 188 सरपंचपदांसाठी निवडणूक झाली. आता जनतेतून निवडून आलेल्या या सरपंचांच्या अध्यक्षतेखाली नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची सभा होवून निवडून आलेल्या सदस्यांतून उपसरपंच पदाची निवडणूक होणार आहे. याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जिल्हा प्रशासन तयार करून संबंधित ग्रामपंचायतींना पाठवणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात उपसरपंच पदाच्या निवडी होण्याची शक्यता असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 203 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम झाला आहे. यात 188 सरपंच पदासाठी निवडणूक झाली असून 15 सरपंच आधीच अविरोध निवडून आले होते. जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाची यादी आज (शुक्रवारी, 23 डिसेंबर) राजपत्रात प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच उपसरपंच या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम तयार करण्यात येणार असून, या निवडणूक कार्यक्रमानुसार नवनिर्वाचित सरपंचांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा होणार आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच राहणार असून त्यात उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. जनतेतून सरपंच निवडला गेला असला तरी उपसरपंच निवडीतून नव्याने सदस्य झालेल्यांच्या मतालाही आता किंमत आली आहे. त्यामुळे गावोगावी उपसरपंच निवडीही चुरशीच्या होण्याची शक्यता आहे.

COMMENTS