Homeताज्या बातम्यादेश

कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा तुरूंगात मृत्यू

लखनौ ः उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. बांदा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या

पिंपरी चिंचवड हादरलं !
नाकृउबा समितीच्या उत्पन्नात भरघोस वाढ
प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरी करणारी महिला आरोपी जेरबंद

लखनौ ः उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. बांदा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या मुख्तारची  तब्येत बिघडल्यानंतर त्याला वैद्यकीय महाविद्यालयत दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान मुख्तार अन्सारीचा मृत्यू झाला.  संपूर्ण उत्तर प्रदेश राज्यात जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे.

मऊ, गाजीपूर आणि बांदामध्ये सुरक्षा दलांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्तार अन्सारी यांची या आठवड्यात दुसर्‍यांदा तब्येत बिघडली होती. पहिल्यांदा चेकअप करून पुन्हा तुरुंगात पाठवले होते. गुरुवारी पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली. चेकअपमध्ये हार्ट अटॅकची शंका आल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेचून मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर मेडिकल कॉलेजला पोलीस छावणीचे रुप आले आहे. पोलिस अधिकारी रुग्णालय परिसरात पोहोचले आहेत. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने वेळोवेळी मुख्तार अन्सारीचे हेल्थ बुलेटिन जारी करून त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. 26 मार्च रोजी 16 तास अतिदक्षता विभागात ठेवल्यानंतर मुख्तारला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर मुख्तारची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले. तीन डॉक्टरांचे एक पॅनल तुरुंगात मुख्तारच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. अंसारीच्या मृत्यूबाबत बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी संशय व्यक्त केला आहे. अंसारी याचा जेलमध्ये झालेल्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबीयांकडून गंभीर आरोप करण्यात आले आहे. या आरोपांची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी मायावती यांनी सरकारकडे केली आहे. तपासाअंती सत्य काय ते समोर आणले गेले पाहिजे, असं मायावती यांनी म्हटले आहे. मुख्तार अंसारीने उत्तर प्रदेशातील मऊ विधानसभा मतदारसंघाचे पाच वेळा आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधीत्व केले होते. दोन वेळा बसप, दोन वेळा अपक्ष आणि एकदा कौमी एकता दल पक्षाचा आमदार म्हणून अंसारी विधानसभेवर निवडून गेला होता. एप्रिल 2023 मध्ये अंसारीला भाजप आमदार कृष्णचंद्र राय यांच्या हत्येप्रकरणी दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर 13 मार्च 2024 रोजी शस्त्र बाळगण्याचा खोटा परवाना मिळवल्याप्रकरणी शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या मुख्तार अंसारीचा काल, गुरूवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे जेल प्रशासनाने सांगितले होते. परंतु मुख्तार अंसारीचा मुलगा उमर अंसारीने जेल प्रशासनावर गंभीर आरोप लावले आहेत.

COMMENTS