पुणे/प्रतिनिधी : फेड न्यूज प्रकरणी भाजपच्या चिंचवड मतदार संघातील उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. या संदर्भात परिपत

पुणे/प्रतिनिधी : फेड न्यूज प्रकरणी भाजपच्या चिंचवड मतदार संघातील उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. या संदर्भात परिपत्रक काढून निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे.
कसबा आणि चिंचवड मतदार संघात भाजप आणि महाविकास आघाडी जोरदार प्रचार करत आहे. या निवडणुकीत गैर प्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, पैसे देऊन बातमी प्रकाशित केल्या प्रकरणी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. त्यांनी एका संकेतस्थळाला तसेच आणि एका साप्ताहिकात हा मजकूर प्रसिद्ध केला आहे. हा मजकूर पैसे देऊन प्रसिद्ध केल्यासारखा निवडणूक आयोगाला वाटत आहे. निवडणूक योगाने यासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि सह नियंत्रण समिती एमसीएमसी स्थान केली आहे. या समितीने ही माहिती निवडणूक आयोगाला दिल्यावर आयोगाने अश्विनी जगताप यांना नोटीस दिली आहे. 16 तारखेला ही नोटीस देण्यात आली असून या बाबत जगताप यांनी सोमवारी उत्तर देखील दिले आहेत. हा खुलासा या समितीला निवडणूक आयोगाने पाठला असून याची तपासणी केल्यावर या बाबत कारवाई केली जाणार आहे.
COMMENTS